Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Maharashtra Government Announce Flood Relief: महाराष्ट्र सरकारने ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ८,००० कोटी रुपयांची मदत दिलीय.सरकारने ३२,००० कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग म्हणून १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ११,००० कोटी रुपये जमा करणार असल्याचं सांगितलंय.
Maharashtra Government Announce Flood Relief
Maharashtra government distributes ₹8,000 crore flood relief; farmers to get ₹11,000 crore more soon.Saam Tv
Published On
Summary
  • आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

  • पुढील १५ दिवसांत आणखी ११ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार

  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडलाय. काहींच्या शेतातील जमीन खरडून वाहून गेलीय. तर कोणाच्या शेतातील जनावरांचा गोठा जनावरांसह वाहून गेलाय. मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार धावून आले असून सरकारनं ३२ हजार कोटींची मदत जाहीर केली. त्यातून आतापर्यंत ८ हजार कोटींची मदत झालीय. याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना मिळालाय.

Maharashtra Government Announce Flood Relief
Maharashtra Politics : बंजारा समाजाचा ST मध्ये समावेश करा, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, काय तोडगा निघणार?

शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. आता मदतीचा पुढचा हप्पात येत्या पंधरा दिवसात दिला जाणार आहे. पुढील १५ दिवसांमध्ये आणखी ११ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही मदत पुढच्या १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर हे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत.

Maharashtra Government Announce Flood Relief
Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिलीय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नसणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. पुढील १५ दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान ९० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत.

ज्या शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले आहे. या बाबी तपासून उर्वरित १० टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच कोणताच शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी केली जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com