Dhananjay Munde Criticized MLA Laxman Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ...म्हणून लक्ष्मण पवारांची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे यांचा पलटवार

Priya More

विनोद जिरे, बीड

पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करत बीडच्या गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी आपण विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. 'मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही.', अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली होती. लक्ष्मण पवार यांच्या या वक्तव्यावर आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे.

'बीडच्या गेवराई मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिला आहे. त्यांनी सत्तेमध्ये असताना मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेचे काम होत नाही म्हणून आपल्या पक्षावरती आरोप करायचे, यात काही तथ्य नाही. मुळात त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा किती प्रचार केला?', असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

तसंच, 'मतदारसंघात विकास केला असता तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लिडसुद्धा मिळाली असती. पण त्यांनी सरकारमधून घेतलेला निधी हा जनतेपर्यंत पोहोचला की नाही? हेच कुठेतरी त्यांच्या मनाला लागला असेल. आपण जनतेपर्यंत तो निधी पोहोचू शकलो नाही हे त्यांना जाणवले असेल. त्यामुळे ते आता निवडणुकीतून माघार घेत असावेत असा माझा समज आहे.' असा पलटवार धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण पवार यांच्यावर केला आहे.

दरम्यान, 'गेवराई मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सत्तेमध्ये राहून देखील जनतेची कामे होत नसेल तर काही उपयोग नाही. मी किंवा माझ्या परिवारातील कोणीही निवडणूक लढवणार नाही. पालकमंत्री माझे ऐकत नाहीत केवळ तीन चांगले अधिकारीसुद्धा माझ्या मतदारसंघाला मिळू शकले नाही.', असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या होत्या. आता त्यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत अनेक सवाल उपस्थित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT