Ajit Pawar And Amit Shah  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्रीपद फिरते असावे?, अजित पवारांची अमित शहांकडे मागणी

Ajit Pawar Demat To Amit Shah Regarding CM Post: महायुतीमधील मुख्यमंत्रिपद तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून देण्यात यावे अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये देखील जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये होत असलेल्या कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आक्रमक पवित्रा घेण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही आहेत.

महायुतीमधील मुख्यमंत्रिपद तीनही घटक पक्षांना आलटून-पालटून दिले पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी या मागणीचे खंडन केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान अमित शहांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वंतत्र चर्चा केल्याचे देखील सांगितले जात आहे.

अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद फिरते असले पाहिजे, अशी अट घातल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले तर प्रत्येक घटक पक्षाला आलटून पालटून मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी अमित शहा यांच्यापुढे व्यक्त केले.

पण या बैठकीनंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाबाबत अशा कोणत्याच मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्रिपदाचा मुद्दासुद्धा उपस्थित झाला नाही.' असे प्रफुल पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यासोबतच, 'महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असू एकमेकांमधील समन्वय वाढवण्यावरील चर्चेला या बैठकीमध्ये अधिक भर देण्यात आला होता.' असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

Gautami Patil Video: सबसे कातील गौतमी पाटील! स्टेजवर पाय ठेवताच गोविंदांचा एकच जल्लोष; जबरदस्त ठुमके एकदा बघाच

Maharashtra Live News Update: सातपुड्याच्या चादसैली घाटात पुन्हा कोसळली दरड

Dog Lovers: पुण्यात श्वानप्रेमींचा संताप उसळला; कोर्टाच्या आदेशाविरोधात रस्त्यावर आंदोलन|VIDEO

Minio Green: भारतीय बाजारात धडकणार नॅनोपेक्षा लहान मिनी इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या दमदार फिचर्स

SCROLL FOR NEXT