Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवारांचे सुशिल कुमार शिंदेंवर गंभीर आरोप; २००३ च्या त्या योजनेबाबत केला मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sushilkumar Shinde : 2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांची वीज बील माफ योजना बंद केली, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान केला आहे.

Sandeep Gawade

२००३ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारमध्ये सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना निवडणुकीवेळी शेतकऱ्यांच वीजबील माफ केलं होतं.मात्र निवडणुकीनंतर योजना बंद केली. याविषयी विचारलं असता आता निवडणूक झाली आता त्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान केला आहे. आता सुशिलकुमार शिंदे आणि काँग्रेस त्यांच्या या आरोपाला काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे.

लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले आहेत. ५२ लाख कुटुंबाना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. कोणतीही दलाली नाही मध्यस्थी नाही, थेट या ५२ लाख महिलांच्या बँक खात्यात तीन सिलिंडरचे पैसे जमा केले जातील. शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं आहे, मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे, मी शब्दाचा पक्का आहे, ते बोलतो ते करतो, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो असं आवाहन आज अजित पवार यांनी बीडमधून केलं.

...तर पोलीस आणि शिक्षक, मुख्याध्यापकांना सुट्टी नाही

यावेळी त्यांनी महिला सुरक्षा, विकास कामे आणि योजनांबाबतही खुलासा केला. सध्या देशात अन् महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आता त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यायची आणि 10 पिढ्या आठवणीत ठेवतील अशी शिक्षा द्यायची. कधीकधी महिला तक्रार करायला घाबरतात, मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, न घाबरता तक्रार करायची आणि जर पोलिसांनी आता तक्रार घेतली नाही तर त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला सुट्टी नाही. तसंच जर एखादी घटना शाळेत घडली अन् ती शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी झाकून ठेवली तर त्यांना देखील सुट्टी नाही, असा दम अजित पवारांनी भरला आहे.

राजकोटवरील शिवपुतळा बनवणारा बेपत्ता झाला

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींना दुःख झालं आहे. ज्याने तो पुतळा तयार केला तो बेपत्ता झाला आहे. मात्र तो भारताबाहेर तर जाणार नाही ना ? त्याला शोधून काढून कठोर शिक्षा देणार आहे. त्यावरून विरोधक टीका करतात त्याच्यामध्ये घोटाळा झाला, बोगसपणा झाला, मात्र ते आम्ही शोधून काढू, असा विश्वास त्यानी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT