Manoj Jarange Patil: आंदोलनाची वर्षपूर्ती! काय कमावलं काय गमावलं? जरांगे पाटीलांची मोठी प्रतिक्रिया; मराठा बांधवांना दिला शब्द

Manoj Jarange Patil Press Conference Jalna: वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी गेल्या एका वर्षाच्या आंदोलनावर भाष्य केले. तसेच काहीही झाले तरी आरक्षण मिळवून देणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Manoj Jarange Patil: ऐतिहासिक आंदोलनाची वर्षपूर्ती! काय कमावलं काय गमावलं? जरांगे पाटीलांची मोठी प्रतिक्रिया;  मराठा बांधवांना दिला शब्द
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

अक्षय शिंदे|ता. २९ ऑगस्ट २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यात मोठा उद्रेक झाला अन् जरांगे पाटील हे नाव चर्चेत आहे. आज वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी गेल्या एका वर्षाच्या आंदोलनावर भाष्य केले. तसेच काहीही झाले तरी आरक्षण मिळवून देणार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"एका वर्षात आपल्याला काय मिळालं आणि काय मिळवायचं आहे. आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून का एक होत नाही हे काळजाला लागायचं. कुठेतरी वाटायचं समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. 29 ऑगस्ट 2023 ला क्रांती झाली शहागडच्या पैठण फाट्यावर उठाव झाला. मराठा एक होत नाही हे चॅलेंज होतं नेमकी मराठा एक झाला, मराठा समाज एकजूट आहे हाच आयुष्याचा आनंद आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना इशारा

तसेच "मराठ्यांनी सगळं सरकार पागल करून टाकलं आहे. जडी बुटीवाला छगन भुजबळ यांच्याकडून गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. मराठ्याच्या ह्या आंदोलनामुळे दहा टक्के आरक्षण मिळाले ते आपल्याला मान्य नाही. देवेंद्र फडणवीस विचित्र नेते आहेत. आपल्याला दहा टक्के आरक्षण मान्य नाही पण ते आपल्यावर लादलं. कोणी काही म्हणू द्या पण गावच्या गाव कुणबी नोंदी मिळाल्या, दीड पावणे दोन कोटी लोक आरक्षणात गेले शंभर टक्के आंदोलन यशस्वी झालं. दिवस बदलतात देवेंद्र फडणवीस दम धरा," असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil: ऐतिहासिक आंदोलनाची वर्षपूर्ती! काय कमावलं काय गमावलं? जरांगे पाटीलांची मोठी प्रतिक्रिया;  मराठा बांधवांना दिला शब्द
Maharashtra Politics : विधानसभेसाठी संघाचा नवा प्लान? सत्तेसाठी गडकरींना गळ?, केंद्रातला चेहरा महाराष्ट्रात आणण्याची रणनीती?

लाडकी बहीणवरुन टीका!

"लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायला लागलेत लाडक्या भाच्याचे काय? भाच्याला आरक्षण पाहिजे, दाजी शेतात काम करतो त्याचं काय? दाजीला फक्त तऱ्हाला लागू दे दाजी कचका दाखवणार आहे. पंधराशे रुपये दिले देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे शेती विकली का? बंगला विकला का? तू आरक्षण दे राजकीय बोलायचं बंद कर. तुमचे 113 जर आमदार पाडले नाही तर नाव बदलून ठेव. राजकीय लोक लय बेकार असते, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे कित्येक लोक मला रात्रभर भेटतात," असा गौप्यसफोटही जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील ज्या पैठण फाट्यावर सभा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दंड थोपटले होते. आज त्याच ठिकाणाला जरांगे पाटील यांनी भेट घेतली. या आंदोलनानंतर राज्यात मनोज जरांगे पाटील प्रचंड चर्चेत आले होते. लोकसभेला गेंमचेंजरची भूमिका निभावल्यानंतर आता विधानसभेतही जरांगे फॅक्टर पाहायला मिळणार आहे.

Manoj Jarange Patil: ऐतिहासिक आंदोलनाची वर्षपूर्ती! काय कमावलं काय गमावलं? जरांगे पाटीलांची मोठी प्रतिक्रिया;  मराठा बांधवांना दिला शब्द
Sangli Crime : चोर समजून पोतराजासह दोघांना मारहाण; विटा-कराड रस्त्यावरील प्रकार, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com