Nana Patole News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर; विद्यमान आमदारांच्याही जागा धोक्यात? काय आहे कारण?

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सर्व विद्यमान आमदारांच्या कामाचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच विद्यमान आमदारांना विधानसभेचं तिकिट द्यायचं की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Sandeep Gawade

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर असून कोणतीही रिस्क न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा विडणुकीवेळी ज्या ठिकाणी विद्यमान खासदार होते, ती जागा त्या पक्षाने लढवावी ही भूमिका काँग्रेसची होती, मात्र विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झाल्याने याच मुद्यावरून काँग्रेस पक्ष घेणार माघार आहे. ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे, त्याला देखील तिकीट द्यायचं की नाही याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे विद्यमान आमदारांची जागाही धोक्यात आल्या आहेत.

प्रत्येक जागांची चाचपणी केली जाणार आणि जर अहवाल आमदाराच्या विरोधात असेल तर तिकीट नाकारलं जाणार आहे. सर्व आमदारांच्या कामाचा आराखडा तयार केला जाणार आणि मग जागा लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस 5 आमदारांनी क्रॉस वोटींग केलं होतं. त्यानंतर 5 आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिली होती, तर २ आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने राज्यात काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी २० ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे.

वांद्रे पूर्व मधील काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. मागील विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये झिशान सिद्दकी यांचं नाव चर्चेत होते. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून तयारीही सुरू केली आहे. नुकतीच काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीला वरुण सरदेसाई हे उपस्थित राहिले होते. यावरुन झिशान सिद्दकी यांनी टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics : मराठी भाषा वादात हिंदूत्वाची एन्ट्री; गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, मंत्री नीतेश राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

SCROLL FOR NEXT