Bangladesh Crisis : शेख हसीना यांनी भारतात का घेतला आश्रय? ; सीमेवर काय आहे स्थिती, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर

S. Jaishankar On Bangladesh Crisis : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक नागरिकांवर होणारे हल्ले चिंता वाढवणारे आहेत. हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली होती, असं उत्तर दिलं आहे.
Bangladesh Crisis
Bangladesh CrisisSaam Digital
Published On

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराचा भडका उडाला आहे. संपूर्ण देशात यादवी माजली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला आहे. त्यावर आज परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक नागरिकांवर होणारे हल्ले चिंता वाढवणारी आहे. हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची परवानगी मागितली होती. बांग्लादेशच्या लष्कर प्रमुखांनी वक्तव्यानंतर सीमेवर सुरक्षा वाढवली असून प्रत्येकाची चौकशी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

आम्ही बांगलादेशमधील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहोत.बांग्लादेशात जुलै महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. तिथे पोलिसांवर हल्ले केले गेले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देखील हल्ले सुरूच होते. हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष बनवलं गेलं. काल दुपारी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्या काल सायंकाळी दिल्लीत पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं.

भारत बांगलादेश सीमेवर हायअलर्ट

दरम्यान बांगलादेश हिंसाचार आणि शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर भारत बांगलदेश सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. सीमेवरील रसदही वाढवण्यात आली असून कसून चौकशी केली जात आहे. सीमेवर भारतीय सैनदलाचा जागता पहारा ठेवला आहे.भारत सरकार लष्करप्रमुखांच्या संपर्कात आहे. बांगलादेशमधील प्रभारी सरकार भारतीय उच्चायुक्तालय आणि अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करेल, असी आशा असल्याचं ते म्हणाले.

Bangladesh Crisis
Chandigarh Mayor Resigns: मोठी बातमी! चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी दिला राजीनामा

शेख हसीना सध्या भारतातच

शेख हसीना आणखी काही दिवस भारतात राहू शकतात. मात्र, या काळात त्या हिंडन एअरबेसमधून बाहेर पडणार नाहीच. त्यांच्यासाठी हिंडन एअरबेसवरील गेस्ट हाऊसमध्येच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बांगलादेश सोडताना हसीनाचे काही नातेवाईकही त्यांच्यासोबत आले असून ते लंडनला रवाना झाले आहेत. तर शेख हसीना कुठे जाणार हे अद्याप ठरलेले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या सध्या ब्रिटन किंवा फिनलँडमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली होती, त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Bangladesh Crisis
Who is Muhammad Yunus: शेख हसीना यांच्यानंतर नोबेल विजेते चालवणार बांगलादेशचं सरकार, मोहम्मद युनूस यांच्याकडेच का सत्ता?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com