Chandigarh Mayor Resigns: मोठी बातमी! चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी दिला राजीनामा

Manoj Sonkar Resignation: चंदीगड महापालिका निवडणुकीत महापौर झालेले भाजपचे मनोज सोनकर यांनी रविवारी रात्री राजीनामा दिला आहे.
Chandigarh Mayor Resigns
Chandigarh Mayor ResignsSaam Tv
Published On

Chandigarh Mayor Resigns:

चंदीगड महापालिका निवडणुकीत महापौर झालेले भाजपचे मनोज सोनकर यांनी रविवारी रात्री राजीनामा दिला आहे. 30 जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापालिका निवडणुकीत गडबड करून चुकीच्या पद्धतीने महापौर निवड झाली, असे आरोप झाले होते. मनोज सोनकर यांचा हा राजीनामा सर्वोच्च न्यायालयात सोमवारी या प्रकरणी सुनावणी होण्यापूर्वीच आला आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या चंदीगडच्या नगरसेवक पूनम देवी, नेहा मुसावत, गुरचरण काला यांनी चंदीगड भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे दोन नगरसेवकही भाजपच्या संपर्कात आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandigarh Mayor Resigns
Indapur Politics: इंदापुरात पुन्हा पाटील विरुद्ध पवार संघर्ष! लोकसभा निवडणुकीवरून अंकिता पाटलांचा थेट अजित पवारांना इशारा

सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत पीठासीन अधिकारी अनिल मसिहही हजर राहणार आहेत. महापौर निवडणुकीतील पीठासीन अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ते बेकायदेशीर ठरवणाऱ्या नगरसेवकांच्या मतांवर मार्किंग करताना दिसत होते. (Latest Marathi News)

काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक युतीने लढवली होती. या गडबडीच्या विरोधात आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर न्यायालयाने चंदीगड प्रशासनाला फटकारले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी निश्चित केली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वीच महापौर सोनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Chandigarh Mayor Resigns
India Alliance: मायावती इंडिया आघाडीत होणार सामील? काँग्रेस नेत्याने केलं मोठं वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात फटकारले होते

चंदीगड महापौर निवडणुकीदरम्यान जे काही घडले ते लोकशाहीची चेष्टा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देणार नाही, असे म्हटले होते. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांना पुढील सुनावणीच्या तारखेला 19 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com