Maharashtra Politics X
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पी.एन. पाटील गटातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • काँग्रेसला मोठा धक्का; पी. एन. पाटील गटातील नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश.

  • कोल्हापुरात आगामी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली, काँग्रेस पक्षावर परिणाम.

  • राहुल पाटील यांनी पक्षप्रवेशादरम्यान अजित पवारांचा आभार व्यक्त करत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्वेच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु असताना काँग्रेसचा मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली समोर आली आहे. काँग्रेस पक्षातील बडा नेत्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश झाला आहे. राहुल पाटील, राजेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकींपूर्वी कोल्हापुरात काँग्रेसला जोरदार धक्का असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढला आहे.

मागील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले. माझे वडील पी.एन.पाटील आणि माझ्या मातोश्री गेल्या. पवार साहेबांनी, पवार कुटुंबीयांनी धीर दिला. पण काहींना आमची आठवण देखील झाली नाही, असे म्हणत राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षातील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली.

पक्षप्रवेशादरम्यान राहुल पाटील यांनी 'आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमचे सगळे कार्यकर्ते, आता राष्ट्रवादीचे शिलेदार असणार. निवडणुकीनंतर आमच्या मनात खदखद होती. अशा काळात अजित दादा तुम्ही आम्हाला हात दिला. तुम्ही खंबीर साथ दिल्याने आजचा हा कार्यक्रम संपला आहे. ज्या पद्धतीने पी एन पाटील यांनी एका विशिष्ट विचारसरणीने काम केले, एका घराण्यावर निष्ठा ठेवली, त्याच पद्धतीने आम्ही आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहणार. इथून पुढे माझ्यासोबत आणि माझ्या कार्यकर्त्यांसोबत दादा तुम्ही नेहमी सोबत रहा', असे वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT