Manoj Jarange Patil : ...तर मी सरकारही पाडू शकतो, मनोज जरांगेंची थेट धमकी

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. चलो मुंबई या मोर्चाआधी घेतलेल्या पत्रकार परिषदात जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilx
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, आरक्षण न दिल्यास ते सरकार पाडण्याची ताकद ठेवतात.

  • २७ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ मोर्चा निघणार असून २९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण होणार आहे.

  • मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा, अन्यथा राज्यभर कामबंद करून मोठा उठाव करू, असा इशारा जरांगेंनी दिला.

Manoj Jarange Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दंड थोपटले आहेत. २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वामध्ये चलो मुंबई या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार आहेत. मोर्चा सुरु होण्याआधी आज (२५ ऑगस्ट) जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मी सरकारही पाडू शकतो, असे म्हटले आहे.

आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला येणार नाही. दोन दिवसांचा वेळ आहे. आजपासून मी बोलणार नाही. फडणवीस यांना ही प्रेमाची विनंती आहे. आम्हाला संविधानात बसणारे आरक्षण हवे आहेत. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. ओबीसी तुमचे आहेत, आरक्षण दिल्यास मराठेही तुमचे होतील, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : २९ ऑगस्टला मुंबईत एल्गार! याआधी मनोज जरांगे पाटलांनी कधी-कधी केलं आंदोलन?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'मी एकदा अंतरवाली सराटी सोडले की आम्ही कुणाचेही ऐकणार नाही. मंत्री येऊ द्या, नाहीतर कुणीही येऊद्या. मी कुणाचेही ऐकणार नाही. मी सरकारही पाडू शकतो. आमची ही मागणी आजची नाही. पत्रकारांसमोर चार महिन्यापूर्वी आम्ही तारीख जाहीर केली होती. मग आडमुठेपणा कुणी केला. चार महिन्यात सरकारने काहीही केले नाही. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मी आता शांत बसणार नाही'

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : फडणवीस सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, एकदा निघालो तर थांबणार नाही; मनोज जरांगेंची डरकाळी

मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा कायदा पारीत करता येत नाही, असे महाजन म्हणाले होते. आधारच नसेल तर कायदा टीकेल कसा. शिंदे साहेबांची समिती गठीत केली, त्यांनी नोंदी शोधल्या. त्याचे खंड सरकारला दिले. ५८ लाख नोंदींचा आधार आहे. मग आता कायदा का पारीत होत नाही. तुमच्या समितीने अहवाल दिला. तुम्ही ठरवा.. काय ते.. सर्व आधार मिळाला. मग आरक्षण का देत नाही? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil
Actor Death : KGF चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा. त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. मागण्यांव मी आणि मराठे ठाम आहेत. तुमच्या हातात दोन दिवस आहेत. राज्यातील सर्व मराठ्यांनी कामे बंद करा. नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, सर्वकाही बंद ठेवा. सर्वांनी मुंबईकडे जायची तयारी करा. असा एकतेचा उठाव जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही. लढ्याच्या सोहळ्यात मराठ्याच्या घरातील प्रत्येकाने सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com