Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसच्या ट्रॅपमध्ये आमदार फसले? क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाई करणार; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Reaction On Jayant Patil Defeat: विधानपरिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार फुटल्याची कबुलीच नाना पटोलेंनी दिलीय. एवढंच नाही तर काँग्रेसने रचलेल्या सापळ्यात आमदार अडकल्याचंही पटोलेंनी सांगितलं.

Rohini Gudaghe

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत महायुतीचे ९ आणि ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झालाय. मात्र शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. त्यातच काँग्रेसची मतं फुटल्याची कबुलीच खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. तर क्रॉस वोटिंग करणारे आमदार आमच्या ट्रॅपमध्ये अडकल्याचंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.

विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसचं ३७ मतांचं संख्याबळ (Legislative Council Elections) होतं. त्यातच २०२२ प्रमाणे आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास काँग्रेसचा उमेदवार पडू शकतो, ही शक्यता होती. त्यामुळे काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना निवडून आणण्यासाठी २८ मतांचा कोटा ठरवून दिला होता. मात्र त्यातील ३ मतं फुटली तर नार्वेकरांना दिलेली ५ मतं फुटली.

त्यामुळे आमदारांनी दगाफटका केल्यानंतरही प्रज्ञा सातवांच्या पराभवाची नामुष्की टळली. मात्र आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेस अॅक्शन मोडवर आलीय. तसंच क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचा इशारा नाना पटोलेंनी (Congress Leader Nana Patole) दिलाय.

एकीकडे नाना पटोलेंनी फुटीर आमदारांना इशारा दिलाय. तर या फुटीर आमदारांमध्ये विदर्भातील १, मराठवाड्यातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २ आणि मुंबईतील १ आमदाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी (Maharashtra Politics) दिलीय. त्यामुळे काँग्रेस फुटीर आमदारांवर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT