Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं बुलडोझर सरकार! युपीचा बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात, दंगलखोरांच्या घरांवर जेसीबीची कारवाई

Maharashtra : महाराष्ट्रात बुलडोझर कारवाई चर्चेत आलीय.. आता नागपूर दंगलीच्या मास्टरमाईंडच्या घरावर बुलडोझर चालवलाय.. मात्र आतापर्यंत राज्यात किती वेळा बुलडोझर कारवाई करण्यात आलीय? आणि विरोधकांनी बुलडोझर कारवाईबद्दल नेमकं काय म्हटलंय? पाहूयात या

Yash Shirke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बुलडोजर पॅटर्न.. नागपूरमध्ये दगडफेक, जाळपोळ करण्यासाठी चिथावणी दिलेला मास्टरमाईंड फहीम खानचं घर नागपूर महापालिकेनं कडेकोट बंदोबस्तात उध्वस्त केलंय..एवढंच नाही तर दंगलीतील आरोपी युसुफ शेखच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आलाय...मात्र हीच कारवाई वाल्मिक कराड आणि प्रशांत कोरटकरवर का नाही असा प्रश्न उपस्थित करत कॉंग्रेसने महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय..

औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती.. त्यानंतर फहीम खान या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं... त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दंगलखोरांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते...2022 पासून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. या काळात किती प्रकरणात दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आलाय? पाहूयात..

फडणवीसांचा बुलडोजर पॅटर्न

- जानेवारी 2023

मुंबई मालवणी परिसरात हिंसाचारानंतर बुलडोझर कारवाई

- 24 मार्च 2025

नागपूर दंगलीनंतर फहीम खानच्या घरावर बुलडोझर

- 23 जानेवारी 2024

मुंबईतील नया नगरमध्ये दगडफेकीनंतर अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

घरावर बुलडोजर चालवला जात असताना फहीम खानने उच्च न्यायालयातून कारवाईला स्थगिती मिळवलीय..

आतापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये दंगलखोरांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा पॅटर्न सुरु होता.. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांनी गुन्हेगारांवर आणि दंगलखोरांवर जरब बसवण्यासाठी बुलडोजर पॅटर्न सुरु केलाय.. त्यामुळे या नव्या पॅटर्नमुळे गुन्हेगारी अटोक्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT