Shinde Sena's Vidarbha Strategy Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेची फिल्डिंग, शिवसेनेच्या विस्तारासाठी मास्टरस्ट्रोक, आतापर्यंत काय-काय घडलं?

Shinde Sena's Vidarbha Strategy: भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Priya More

भाजप आणि आरएसएसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संघटनात्मक विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विदर्भात आपला पक्ष वाढवण्यासाठी शिंदेंकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीत असतानाही शिवसेनेकडून विदर्भात स्वतंत्र संघटनात्मक ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या मजबूत संघटनात्मक रचनेत कार्यकर्त्यांना मर्यादित संधी मिळत असल्याने शिंदेंची शिवसेना कार्यकर्त्यांसाठी राजकीय पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरातील ६ विधानसभा मतदारसंघांसाठी ६ शहरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली संघटना विकेंद्रित करण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. एप्रिलमध्ये माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. अमरावती विभागातील त्यांच्या समर्थकांचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नोव्हेंबरमध्ये विदर्भात व्यापक दौरा झाला. त्यांनी नागपूर, अमरावती आणि गडचिरोलीवर विशेष लक्ष दिले. दक्षिण नागपुरातील पक्षप्रवेश कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांमधील सुमारे २५० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस, भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.

कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी -

भाजपमध्ये मजबूत संघटनात्मक जाळे आणि प्रस्थापित नेतृत्वामुळे नव्या कार्यकर्त्यांना पदे आणि निवडणुकीची संधी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. तुलनेने लहान संघटना असलेल्या शिंदे शिवसेनेत शहर, मतदारसंघ, जिल्हा आणि विभागीय स्तरावर पदाधिकारी होण्याच्या अधिक संधी आहे. मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वाढलेली राजकीय दृश्यता, जनसंपर्क आणि लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजनांमुळे पक्षाची लोकप्रियता वाढल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा आहे.

पूर्व विदर्भात भाजपचे वर्चस्व असल्याने महायुतीत शिवसेनेला अनेकदा राजकीय महत्त्वाकांक्षा आणि संघटनात्मक मागण्यांवर तडजोड करावी लागल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे. पूर्व विदर्भाला अपेक्षित लक्ष मिळाले नसल्याने आता नागपूर, अमरावती आणि गडचिरोलीत संघटनात्मक विस्तारावर भर दिला जात आहे. आमदार उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे, बैठका आणि संघटनात्मक कार्यक्रम हा विस्ताराचा भाग आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेत्यांना हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याची भावना असल्याने त्यांनाही पक्षात आणण्याचा प्रयत्न केला.

भाजपला काय वाटतं?

शिवसेनेच्या पक्षविस्तराबाबत भाजपकडून मात्र फारशी चिंता व्यक्त केली जात नाही. नागपूरमधील भाजप नेत्याने शिवसेनेत कार्यकर्ते प्रवेश करत असल्याची माहिती नसल्याचे सांगत या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

विदर्भातील राजकीय गणित -

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर विदर्भातील अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमाने, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव आणि यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी यांनी शिंदे गटाला साथ दिली.फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली.नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

भाजप विरुद्ध शिवसेना : विदर्भातील ताकद -

२०२४ विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ जागांपैकी भाजपने ३८ जागा जिंकल्या. महायुतीला ४८ जागांवर विजय, तर महाविकास आघाडीला १३ जागा जिंकण्यात यश आले. नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने चार, तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरसह विदर्भातील राजकारणावर मोठा प्रभाव आहे. शिवसेनेच्या स्वतंत्र विस्तारामुळे भविष्यात महायुतीमध्ये मतदारसंघ वाटप, राजकीय प्रभाव आणि नेतृत्वाच्या दाव्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पुढे काय?

भाजपशी थेट संघर्ष टाळत शिंदे शिवसेनेकडून विदर्भात हळूहळू स्वतंत्र राजकीय नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न आहे. बच्चू कडू यांच्यासारख्या प्रस्थापित नेत्यांना पक्षात आणणे, नव्या कार्यकर्त्यांना पदे देणे आणि संघटनात्मक विस्तारातून राजकीय ताकद वाढवण्याची रणनीती आहे. मात्र नव्या प्रवेशामुळे पक्षांतर्गत गटबाजी, पदांसाठी स्पर्धा आणि भाजपसोबतच्या महायुतीतील राजकीय समन्वयाचे आव्हान केले. संघटनात्मक विस्तार मतांमध्ये किती रूपांतरित होतो आणि नव्या कार्यकर्त्यांना खरोखर राजकीय संधी मिळते का, हेच शिंदे शिवसेनेसमोरील प्रमुख आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये आवादा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक

Head Tingling : डोक्याला अचानक मुंग्या येतात? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Paper Leak Case: मोठी बातमी! १० कोटींचा दंड अन् १० वर्षे कारावास, पेपरफुटी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Toll Rules : टोल चोरीला बसणार कायमचा चाप, नंबर प्लेटबाबत सरकारचा मोठा निर्णय

Cold Ears in Winter : थंडीच्या दिवसांत कान का दुखतात? पटकन करा 'हे' घरगुती उपाय, गंभीर आजारांपासून होईल बचाव

SCROLL FOR NEXT