Ladki Bahin Yojana  x
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद झाली तर राजीनामा देईन, भाजप आमदाराचं मोठं विधान

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे उमेदवार निवडून आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद पडेल अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान भाजपच्या आमदाराने मोठं विधान केले आहे. लाडकी बहीण योजना बंद झाली तर राजीनामा देईन, असे त्यांनी सांगितले.

Priya More

Summary -

  • भाजप आमदार अमरीश पटेल यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केले

  • शिरपूर-वरवाडे नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केले

  • लाडकी बहीण योजना बंद झाली तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे त्यांनी सांगितले

  • शिंदेसेना मतदारांना खोटं सांगत असल्याचा पटेल यांचा आरोप

भूषण अहिरे, धुळे

'लाडकी बहिणी योजना बंद पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन.', असं मोठं विधान आमदार अमरीश पटेल यांनी केले आहे. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान माजी मंत्री आणि आमदार अमरीश पटेल यांनी हे विधान केले. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे सेनामध्ये चुरस बघायला मिळत आहे. अशातच आमरीश पटेल यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

'शिंदेसेनेच्या वतीने प्रचारादरम्यान मतदारांना जर शिंदेसेनेचे उमेदवार निवडून आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद पडेल असा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप आमदार अमरीश पटेल यांनी विरोधकांवर केला. हा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे म्हणत अमरीश पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि लाडकी बहीण योजना ते बंद होऊ देणार नाही. जर लाडकी बहिणी योजना बंद झाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईल.'असे भर सभेमध्ये जाहीर केले.

आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यामुळे प्रचाराच्या तोफा चांगल्याच तळपल्या आहेत आणि या दरम्यानच आता जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवारांचा प्रचार सर्वच पक्षाच्या पक्षश्रेष्ठींतर्फे करण्यात येत आहे. यादरम्यानच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतन भाई पटेल यांच्या प्रचारार्थ सभेदरम्यान अमरीश पटेल यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले. याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT