Maharashtra Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: लोकसभेच्या निकालाची धास्ती, भाजप विधानसभेला १७० जागा लढवणार? शिंदे गट, अजित दादांच्या वाट्याला काय?

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. ११ जुलै २०२४

लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर आगामी विधानसभेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. एकीकडे लोकसभेतील यशानंतर वजन वाढलेल्या शिवसेना शिंदे गटाने १०० जागांची मागणी केली असताना आता भाजप १६० ते १७० जागा लढवणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली असून विधानसभेत भाजप १६० ते १७० जागा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने १६० च्या खाली जागा लढू नये, अशी स्थानिक नेत्यांची मागणी असून त्यादृष्टीने रणनिती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. परंतु भाजपच्या या दाव्यामुळे महायुतीत जागा वाटपावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने विधानसभेला १०० जागांची मागणी केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटही ७०- ८० जागा मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकट्या भारतीय जनता पक्षाने १६० ते १७० जागा लढवल्या तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला काय येणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT