Mahayuti Clashes
महायुतीत रस्सीखेचSaam Tv

Maharashtra Politics: विधानपरिषद सभापतीपद कोणाला मिळणार? महायुतीत रस्सीखेच, तिन्ही पक्ष दावेदार VIDEO

Ajit Pawar Demand Legislative Council Chairman Seat To Devendra Fadnavis: विधान परिषदेच्या सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्याची माहिती मिळतेय.

सुनील काळे, साम टीव्ही मुंबई

विधान परिषद सभापतीवरून महायुतीमध्ये वातावरण तापल्याचं दिसतोय. आज किंवा उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नवा सभापती निवडला जाणार आहे. त्याअगोदर मात्र, विधानपरिषद सभापती पदावरून महायुतीत जुंपली असल्याचं चित्र आहे. सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने दावा केल्याचं समोर आलंय. सत्तेमध्ये सहभागी होत असताना विधान परिषद सभापतीपद (Legislative Council Chairman Seat) देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

विधानपरिषद सभापतीपद कोणाला मिळणार?

तर दूसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेन देखील सभापती पदावर दावा केल्याचं चित्र आहे. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे सभापती पदासाठी इच्छुक असल्याचं बोललं (Maharashtra Politics) जातंय. आता महायुतीतील कोणत्या पक्षाला विधानपरिषद सभापती पद मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आता सभापती पदावरून महायुतीत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.

तिन्ही पक्ष दावेदार...

विधान परिषदेचं सभापती पद मागील काही काळापासून रिक्त आहे. सध्या विधान परिषदेचे कामकाज उपसभापती निलम गोऱ्हे पाहात आहेत. हे विधानसभा निवडणुकीआधीचे शेवटचं अधिवेशन आहे. त्यामुळे त्यापूर्वी आता विधान परिषदेच्या सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जातेय. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अजित पवार (Ajit Pawar), शिंदेगट आणि भाजपदेखील (BJP) दावा करत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे.

Mahayuti Clashes
Mahayuti PC Video : "मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला महाराष्ट्रात स्थान नाही"- अजित पवार

विधानसभेच्या जागांसाठी महायुतीत रस्सीखेच?

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने (Shinde Group) पुणे शहरातील तीन जागांवर दावा केलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या मतदारसंघांवर सेनेचा दावा आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत दोन वेळा विजय मिळवलाय. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी शिवसेना कडून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता या तिन्ही मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही असल्याचं दिसतंय.

Mahayuti Clashes
Mahayuti Sabha: मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं? शिवाजी पार्कात देवेंद्र फडणवीसांनी 'इंडिया' आघाडीकडे मागितला हिशोब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com