Chitra Wagh Criticizes Supriya Sule Saamtv
महाराष्ट्र

Chitra Wagh News: 'मोठ्ठ्या ताई, जळी स्थळी तुम्हाला देवेंद्रजी दिसताहेत...' चित्रा वाघ सुप्रिया सुळेंवर बरसल्या

Chitra Wagh Vs Supriya Sule: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सुप्रिया सुळेंमध्ये चांगलीच जुंपल्यांचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

Chitra Wagh On Supriya Sule:

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याकडे गृहमंत्री दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळेंच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

"राज्यातील मोठ्या ताई, तुमची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी तुम्ही आहात की काय अशी शंका तुमच्या चिथावणीखोर वक्तव्यांवरून येतेय, ज्या पद्धतीनं परिस्थिती चिघळवणारी वक्तव्यं करताय त्यावरून तुमच्या खोटारड्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटलाय.." अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) टीका केली आहे.

हा आजार बरा नव्हे...

"कावीळ झालेल्यांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी तुमची स्थिती झालीय. जळी-स्थळी तुम्हाला देवेंद्रजी (Devendra Fadanvis) दिसताहेत. लवकर उपचार घ्या ताई. हा आजार बरा नव्हे असे म्हणत आपल्या भावाचा राग तुम्ही देवेंद्रजी यांच्यावर काढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही..." अशी खोचक टीकाही चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आमदार अपात्रेवर बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी दगाबाजी केली, आता अजित दादा गटाने सांभाळून राहिले पाहिजे, असा सल्ला दिला होता. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.

"सत्तेतल्या आमदारांची तुम्ही चिंता करू नका. त्यांचा सरकारवर ठाम विश्वास आहे, पण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे हे तुम्हाला कळालंच असेल, असे चित्रा वाघ म्हणाल्या, तसेच पक्ष टिकवण्यासाठी कधी सुप्रीम कोर्टात, कधी निवडणूक आयोगात जाऊन ड्रामा करण्याची वेळ तुमच्यावर आली.." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT