Sharad Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मराठवाड्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Big Blow to Sharad Pawar in dharashiv: शरद पवार यांना धाराशिवमध्ये मोठा धक्का बसला आहे. धाराशिवमधील अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Priya More

Summary:

  • शरद पवार गटाला धाराशिवमध्ये मोठा धक्का

  • धाराशिवमधील नेते अशोक जगदाळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील टिळक भवन येथे पार पडला

  • प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अमित देशमुख यांच्या उपस्थित प्रवेश

  • शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मराठवाड्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी पक्षाला रामराम ठोकत. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील काँग्रेस मुख्यालयामध्ये आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरिफ भाई शेख, माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले, माजी नगरसेविका सुमनताई जाधव, संजय बेडगे, ताजोद्दीन सय्यद, रुक्नोदीन शेख, आलीम शेख, दत्ता राठोड, अमोल सुरवसे, नवलकुमार जाधव, माजी नगराध्यक्षा रेखाताई वसंत बागल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.

धाराशिवमधील या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले. या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, 'काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेसचा विचार देशाला तारणारा आहे. काँग्रेसचा विचार आणि राहुल गांधी यांचा संघर्ष यावरचा विश्वास दृढ होत असून काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा चांगले दिवस येतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

OBC Reservation On Corporators: ओबीसी कोट्यामुळे 'या' नगरसेवकांना मोठा धक्का|VIDEO

Mumbra Crime : दहशतवादी विरोधी पथकाची महाराष्ट्रातील मुंब्र्यात धाड; शिक्षकाला घेतलं ताब्यात

kolhapur Leopard: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार! तब्बल तीन तास धुमाकूळ घालून अखेर जेरबंद

SCROLL FOR NEXT