Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

junnar leopard : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं आहे. आता शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे.
leopard news
junnar leopard Saam tv
Published On
Summary

शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्याने केला प्रवेश

इलेक्ट्रिक फेन्सिंग असून बिबट्यावर काही परिणाम झाला नाही

बिबट्या पकडण्यासाठी शॉक मशीन बसविण्याचे काम सुरू

पुणे : पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मानव-बिबट यांच्यातील संघर्षात अनेकांनी जीव गमावले आहेत. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झालं आहे. हिंसक बिबटे आता लोकांच्या घरातही शिरू लागले आहेत. जुन्नरमधील शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यातही बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील जुन्नर विधानसभेची निवडणूक लढलेले शरद पवारांच्या गटाचे नेते सत्यशिल शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्याने त्यांच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारली. त्यानंतर या बिबट्याने बंगल्यात प्रवेश केला. बिबट्याच्या मागावर एक तरस असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

leopard news
धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसविण्यात आले आहेत. त्यातील विद्युतप्रवाहाची तीव्रता सुमारे ९ हजार डीसी व्होल्ट इतकी आहे. इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचे आढळून आले. फेन्सिंगशी संलग्न सुरक्षा यंत्रणेतील सायरनही वाजला. मात्र बिबट्याने काही वेळ बंगल्याच्या आतील परिसरातही हालचाल केल्यानंतरच येथील परिसर सोडला. 

leopard news
धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

सध्या बिबट प्रवण क्षेत्रात राज्य शासनाच्या वतीने झटका देणारी ‘शॉक मशीन’ बसविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळात दिसून येईलच. मात्र या व्हिडीओने या यंत्रावर शंका उपस्थित होत असून यावर शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.

Q

जुन्नरमध्ये नेमकं काय घडलं?

A

पुण्यातील जुन्नरमध्ये शनिवारी रात्री बिबट्याची दहशत निर्माण झालीये. शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्याने प्रवेश केल्याची घटना घडली.

Q

बिबट्याने बंगल्यात कसा प्रवेश केला?

A

बिबट्याने कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून बंगल्यात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com