Beed MNS district chief Rajendra Mote joins Sharad Pawar faction; major political shift ahead of elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

MNS Leader Join Sharad Pawar Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोठे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला.

Bharat Jadhav

  • बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा मनसेला जय महाराष्ट्र

  • शरद पवार गटात प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला.

  • निष्ठावंत कार्यकर्त्याने साथ सोडल्यानं मनसेची अडचण वाढली आहे.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून स्थानिक पातळीवर मोठी उलथापालथ होऊ लागलीय. अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. मविआतील अनेक नेते महायुतीत जात आहेत. याचदरम्यान शरद पवार गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बीडमध्ये मोठा धक्का दिलाय.

निष्ठावंत नेत्याला आपल्या गोटात ओढत त्यांनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. ऐन निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांने साथ सोडल्यानं मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या विधानसभा आणि लोकसभेपेक्षा वेगळ्या असतात. या निवडणुकांमध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. त्याचा परिणाम राज्यातील इतर भागातही पडण्याची शक्यता आहे.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मनसेचं इंजिन मविआला जोडलं जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अजून चर्चा झाली नसली तर लवकरच त्यावर तोडगा निघेल. पण त्याचदरम्यान शरद पवार गटाने बीडमध्ये मनसेला धक्का दिलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत २० वर्षांपासून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्याला नेत्याला राष्ट्रवादीनं गळ घातली.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी का सोडली मनसे

राजेंद्र मोटे यांच्या राजकारणाचा सुरुवात मनसेपासून झाली. गेल्या २० वर्षांपासून ते मनसेत होते. बीड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम संभाळलंय. मतदारसंघात त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केलाय. परंतु त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यानं मोटे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटाला मानणारे अनेक लोक आहेत, त्यामुळे या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचा विजय होईल, असा विश्वास राजेंद्र मोटे यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT