Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी वारं फिरलं, भाजपचा बडा नेता आज 'तुतारी' फुंकणार; शरद पवारांची ताकद वाढणार!

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची लगबग दिसून येतेय.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचं यश मिळावं यासाठी त्यांनी दौरे सुरु केले आहेत. आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची लगबग दिसून येतेय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांमधील नाराज तसेच इच्छुक असे अनेक उमेदवार शरद पवार यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर भाजपचे बडे नेते समरजित घाटगे देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

शरद पवार यांच्या दौऱ्याआधी सोलापुरातील कालग विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे. वस्ताद येत आहेत, असं म्हणत समरजित घाटगे भावी आमदार असा उल्लेखही या बॅनर्सवरती करण्यात आला आहे. त्यामुळे कागलमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शरद पवार हे कागलमधील गैबी चौकात आज जाहीर सभा घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे याच गैबी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं घर आहे. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

कालगमध्ये घाटगे विरुद्ध मुश्रीफ लढत?

समरजित घाटगे याआधी भाजपमध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. या मतदारसंघातून आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळणार, अशी आशा घाटगे यांना होती. पण 2019 च्या निवडणुकीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली. त्यामुळे समरजित घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

मात्र, या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचा विजय झाला. आता आगामी निवडणुकीत आपल्याला भाजपकडून विधानसभेचं तिकीट नक्कीच मिळणार, अशी अपेक्षा घाटगे ठेऊन होते. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत आहे. काहीच दिवसांआधी अजित पवार कागलमध्ये आलेले असताना त्यांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे समरजित घाटगे यांनी भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार, ऐन निवडणुकीत ६० पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Viral Video: रिल्सचा नाद बेक्कार... चिमुकली नदीत बुडतेय अन् ती व्हिडीओ काढण्यात मग्न, मन सुन्न करणारा व्हिडीओ

IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल

Gold Silver Rate : दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; चांदीची चकाकी सुद्धा उतरली, आजचा भाव वाचला का?

Maharashtra Politics: कांदेंना 'कारंजा' तर धात्रक यांना 'चिमणी', डमी उमेदवारांमुळे नाशिकचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT