Bhiwandi Shivsena Shinde Group Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंनी दिला भिवंडीत झटका; माजी आमदारासह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

Bhiwandi Shivsena Shinde Group: भिवंडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

Priya More

फैय्याज शेख, शहापूर

विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. भिवंडीमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. माजी आमदारासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये निवडणुकीदरम्यान ठाकरे गटासाठी हा मोठा फटका असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी पूर्वचे माजी आमदार आणि संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. रुपेश म्हात्रे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उबाठा गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची नाराजी त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी शुक्रवारी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत हाती भगवा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

भिवंडी पूर्वमधून ते सतत दोन वेळा शिवसेनेतून निवडून आले होते. भिवंडी पूर्वमधून २००९ मध्ये आबू आझमी हे दोन ठिकाणाहून निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हा २०१० ला भिवंडी पूर्वची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी रुपेश म्हात्रे हे पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये देखील ते निवडून आले होते.

तर २०१९ ला त्यांना हार पत्करावी लागली होती आणि याच मतदारसंघातून रईस शेख हे निवडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांनी ठाणे जिल्ह्याची धुरा सांभाळली होती. ठाणे जिल्ह्यात त्यांनी उद्धव ठाकरे गटाची धुरा सांभाळत शिवसेनेची गळती थांबवली होती आणि ठाणे ग्रामीणमध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून उभारी मिळवली होती. रूपेश म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT