Amit shah eknath shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंचा पक्ष, भाजपात विलीन? शिवसेना खासदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Political News : शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्याचं शिवसेनेच्या खासदाराने म्हटले आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.

Girish Nikam

Maharashtra : महायुती सरकार सत्तेत आलं खरं पण सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचं या ना त्या कारणाने समोर येतंय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेले काही प्रकल्पांचे निर्णय फडणवीसांनी रद्द केले. त्याशिवाय पालकमंत्रीपदाचा वाद आहेच. प्रत्येक ठिकाणी शिंदेंची कोंडी केली जातेय असं चित्र आहे. याच पार्श्वभूमिवर खासदार संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय.

शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिंदेंना दिल्याचं राऊतांनी म्हटलंय. शिंदेंनी शाहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचंही राऊतांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून हा दावा करण्यात आलाय.

पाहुयात अमित शाह आणि शिंदेंमधील कथित संवाद..

अमित शाह- क्या शिंदेजी, सुबह के 4 बजे रहे है, इतना क्या अर्जंट हैं?

एकनाथ शिंदे -आपको सब मालूम हैं, यहा क्या हो रहा हैं

अमित शाह- क्या हो रहा हैं?

एकनाथ शिंदे - माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरु आहेत

अमित शाह-ऐसा कैसा हो सकता हैं? मै देवेंद्र से बात करता हूं.

एकनाथ शिंदे-मुझे दबाने की, खतम करने की पुरी कोशिश हो रही हैं,

एकनाथ शिंदे-आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका वादा था

एकनाथ शिंदे-चुनाव के बाद भी मै ही मुख्यमंत्री रहुंगा

अमित शाह- हमारे 132 लोग चुनकर आये...तो आप कैसे क्लेम कर सकते हो?

एकनाथ शिंदे-मेरे नेतृत्व मैं चुनाव हुवा

अमित शाह-नही, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुआ.

अमित शाह-आपको क्या चाहिए मै कोशिश करुंगा

एकनाथ शिंदे-मुख्यमंत्री

अमित शाह -देखो भाई, वो ठीक नही हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.

एकनाथ शिंदे-मै क्या करुं?

अमित शाह- आप बीजेपी में मर्ज हो जाओ.आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा

अमित शाह-बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नही बनेगा, आपका रिस्पेक्ट हमने रखा हैं

एकनाथ शिंदे- फिर हमारे पार्टी का क्या?

अमित शाह-वो हम पे छोड दो. वो पार्टी हमनेही बनायी. आप चिंता मत करो

अमित शाहांबरोबर चर्चा झाली नाही एकनाथ शिंदेंनी सांगावं, असं आव्हानंच राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलंय. तर शिंदे गटानेही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. आता संजय राऊत यांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे आणि या दाव्याचे राजकीय वर्तुळात कसे पडसाद उमटतायेत. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT