Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Rajkot Fort: मालवणमध्ये राडा, आधी घोषणाबाजी मग हाणामारी; ठाकरे- राणेंसमोरच कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

Aaditya Thackeray VS Narayan Rane In Malvan : मालवणमध्ये आदित्य ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांसमोर आले होते. तेव्हा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.

Rohini Gudaghe

मुंबई : मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते (Aaditya Thackeray VS Narayan Rane ) आमनेसामने आले आहेत. तेव्हा आदित्य ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. मालवणमध्ये (Malvan News) तुफान राडा झाल्यांच दिसत आहे. राणे (Narayan Rane) समर्थक आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) धावून गेल्याचं देखील समोर आलंय. आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकरून जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.

मालवणमध्ये राडा

मालवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue Collapsed Issue Sindhudurg) कोसळल्याप्रकरणी आज मालवण बंदची हाक देण्यात आली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आज मालवणमध्ये ( Maharashtra Politics) आहेत. मालवण बंदला व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याचं दिसत आहे. मालवणमध्ये भाजपचे नेते नारायण राणे दाखल होताच कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.

आदित्य ठाकरे- नारायण राणे आमनेसामने

भाजप आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान आदित्य ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांसमोर आले (Aaditya Thackeray VS Narayan Rane) होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. राजगड कि्ल्ल्यावर हे तणावाचं वातावरण आहे. पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं संतापाचं वातावरण आहे.

राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक जोरदार घोषणाबाजी करत (Malvan News) आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर मालवणमध्ये ठाकरे राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय. गडावरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत (Shivaji Maharaj Statue Collapsed) आहे. तर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबावण्याचं आवाहन करत आहे. राणे समर्थकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT