राजकोट किल्ल्यावर हवेचा प्रवाह जास्त असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. वाऱ्याने पुतळा पडला, मग किल्ल्यावरची झाडे का उन्मळून पडली नाही, असा तिखट सवाल संजय राऊतांनी विचारलाय. ते मुंबईत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, "बदलापूरची घटना ताजी असताना मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. फक्त निषेध करून या प्रकरणाची फाईल बंद करता येणार नाही. कारण, पुतळा उभारताना कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असेल, हे आता उघड झाले आहे".
"हा पुतळा भ्रष्टाचारामुळेच पडला आहे. देशामध्ये अनेक वर्षांपासून मोठमोठे पुतळे उभे आहेत ते का कोसळत नाहीत? कन्याकुमारीच्या समुद्रात अमेरिकेच्या समुद्रात, मुंबईच्या चौपाटीवर, रंकाळा तलावात उभालेले पुतळ्यांना अजून काहीही झालं नाही. प्रतापगडावर ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहतात. मात्र, तिथले पुतळे जागच्या जागीच असल्याचं संजय राऊत म्हणाले".
"पंडित नेहरू आणि शाहू महाराज यांनी स्थापन केलेले पुतळे अजूनही मजबूत आहेत. पण एक 7 महिन्यांमध्ये उभारलेला शिवरायांचा पुतळा पडतो, ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे. राजकोट किल्ल्यावर जर वाऱ्याचा वेग जास्त होता, तर त्याच वाऱ्याने तिथले झाडे का उन्मळून पडली नाहीत?" असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागे ठाणे कनेक्शन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचा यात असू शकतो. खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तीची एक SIT स्थापन करून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. दीपक केसरकर यांना चपलेने मारले पाहिजे आणि लोक मारणार", असं विधानही संजय राऊतांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.