Lok Sabha Election News saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शिंदे गटाचे 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढवण्यास तयार'

Lok Sabha Election News: 'लोकसभेच्या निवडणुका संदर्भात अद्याप भाजपची नावं फायनल झालेली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटातून गेलेल्या 7 खासदारांनी लेखी दिलेला आहे, की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभं राहायचं आहे.'

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election News:

''लोकसभेच्या निवडणुका संदर्भात अद्याप भाजपची नावं फायनल झालेली नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटातून गेलेल्या 7 खासदारांनी लेखी दिलेला आहे, की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभं राहायचं आहे. 10 तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो, त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटप झाले की उमेदवार फायनल व्हायला हरकत नाही'', असं विधान काँग्रेसचे आमदार आणि माझी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलेला आहे.

राजू शेट्टी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''राजू शेट्टी यांच्यासोबत दोन वेळा माझी चर्चा झालेली आहे. त्यांच्या संदर्भातला निर्णय आता राज्य पातळीवरील नेते घेतील आणि येत्या पंधरा दिवसात हा विषय संपेल. राजू शेट्टी यांना बरोबर घेण्याचा माझा प्रयत्न आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सतेज पाटील म्हणाले, ''जनता महाविकास आघाडीला प्राधान्य देईल. केंद्र शासनाने जी यात्रा सुरू केलेली आहे, त्याला जनतेने विरोध केलेला आहे. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मतदान करेल असं मला वाटतं.'' (Latest Marathi News)

'मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही'

लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना पाटील पुढे म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असतात. लवकरच त्यांची नावे देखील जाहीर होतील. यातून एक सरप्राईज उमेदवार ही समोर येईल. मात्र मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही, हे यापूर्वी जाहीर केलेला आहे.''

ते म्हणाले, ''महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे हा एकच उद्देश आमचा प्रमुख्याने आहे. उमेदवारी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेला मिळते याच्यापेक्षा इंडिया आघाडीला यश कसे मिळतं याकडे आम्ही अधिक लक्ष देत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Central Railway : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेवर धावणार १५ डब्यांच्या लोकल गाड्या, गर्दीचा ताण होणार कमी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं? VIDEO

Navi Mumbai: उरण ते खारकोपरदरम्यान लोकलसेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, नेमकं कारण काय?

Chennai News: बाईक थांबवली, पॅन्टची चेन काढली अन्...; पहाटे पाच वाजता महिलेसोबत घडलं भयंकर; VIDEO व्हायरल

Eye Dark Circle Remove Tips: डोळ्याखालची त्वचा काळी झालीये ? मग लगेचच करा हे ५ घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT