Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : विधान परिषदेची १, विधानसभेच्या १० जागा आणि एक मंत्रिपत हवं; रामदास आठवलेंच्या मागणीने महायुतीचं टेन्शन वाढलं

Sandeep Gawade

नागालँडच्या विधानसभेत आरपीआयचे आमदार निवडुन येऊ शकतात मग महाराष्ट्राच्या विधानसभेत आरपीआयचे आमदार यंदा निवडून आलेच पाहिजेत, असा निर्धार करा असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या राज्य कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठकीत त्यांनी आठवले यांनी हे आवाहन केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतुन रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर किमान 6 आमदार निवडूण आणण्यासाठी तयारीला लागण्याचा सूचनाही रामदास आठवले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणिस गौतमभाऊ सोनावने,राज्य कार्यअध्यक्ष बाबुराव कदम,भुपेश थुलकर,युवक आघाडीचे पप्पु कागदे,महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकाता सोनकांबळे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,दयाळ बहादुरे,अण्णा रोकडे,अॅड.आशाताई लंके आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत रिपाइं कार्यकर्त्यांनी महायुतिचा चांगला प्रचार केला.त्याबद्दल रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले. दलित पँथरच्या चळवळीत कार्यकर्त्या प्रमाणे अन्याया विरुध्द पेटून उठावे.अन्याया विरुध्द लढताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संघर्ष केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

10 जागांची मागणी

रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद सदस्यत्व,विधानसभा निवडणुकीत किमान 10 जागा आणि राज्य सरकारच्या मंत्री मंडळात एक मंत्री पद मिळावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार माननारा ठराव मंजुर झाल्याची माहीती रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनावने यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT