Maharashtra Political News  Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : 'अपक्ष खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका', जयंत पाटलांचा विशाल पाटलांना थेट टोला

Maharashtra Political News : सांगलीतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याना इस्लामपूरच्या नामकरणावरून टोला लगावला आहे. तसेच विशाल पाटील यांना देखील चिमटा काढला आहे.

Alisha Khedekar

स्लामपूरचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्यात आलं

राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी या निर्णयावरून टोला लगावला

जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना चिमटा काढला

नामांतराच्या निर्णयावरून सांगलीत राजकीय वाद पेटले

देवा भाऊंना उरणचं नाव आधीच ईश्वरपूर आहे हे माहीत नव्हतं - जयंत पाटील

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ झाले आहे. महाराष्ट्र शासनाने या नामांतराची अधिसूचना जाहीर केली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडियावरून याची घोषणा केली. मात्र या नामकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना देवा भाऊंना ईश्वरपूरच्या आदी उरण नाव आहे हे माहीतच नव्हते असा टोला लगावला आहे. तसेच जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना देखील चिमटा काढत यांना म्हणाले की, "खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका. ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत,"असं म्हटलं.

सांगलीच्या आष्टा येथे बोलताना नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढला आहे. खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे. असे सांगत भाजपाला विरोध करणारे शेतकरी संघटना, उबाठाला सोबत घेऊ. जे समविचारी आहेत ते आमच्याबरोबर आहेत असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे पाटील म्हणाले, देवा भाऊंना ईश्वरपूरच्या आदी उरण नाव आहे हे माहीतच नव्हते. स्थानिक लोकांनी उपोषण केल्यानंतर देवाभाऊंना लक्षात आले की आपल्याला ज्यांनी हे करायला सांगितले आहे त्यांनी मोठी चूक केली आहे. असे म्हणत स्थानिक भाजपा नेत्यांनाही टोला लगावला.

आता दोन मंत्र्यांनी सांगितल्यानंतरही काही उपयोग झाला नाही असे सांगत केंद्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ईश्वरपूरकरांची नाराजी घ्यायला नको म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने उरण बाबतचा आदेश काढल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र उरणातील लोकांची त्यांना मते मिळणार नाहीत असा टोला ही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

Medha Kulkarni Hospitalised : लवकरच भेटू, भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल, पुणेकरांसाठी लिहिला खास संदेश

SCROLL FOR NEXT