Shocking News : धक्कदायक! महिलेने ऑनलाईन मागवलेली औषधं, पार्सल उघडताच उडाली झोप , नेमकं काय घडलं?

America Online Parcel News : एका महिलेने ऑनलाईन औषध मागवलं, मात्र पार्सल उघडल्यावर आत माणसाची कापलेली बोटं आणि हात असल्याचं दिसलं. पोलिसांनी डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधून चौकशी सुरू केली आहे.
Shocking News : धक्कदायक! महिलेने ऑनलाईन मागवलेली औषधं, पार्सल उघडताच उडाली झोप , नेमकं काय घडलं?
America NewsSaam Tv
Published On
Summary

अमेरिकेतील महिलेने ऑनलाईन औषध मागवलं

पार्सलमध्ये निघाली मानवी बोटं

नॅशव्हिल विमानतळावरून चुकीचं पार्सल महिलेच्या घरी पोहोचलं

डिलिव्हरी कंपनीने चूक मान्य केली

पोलिसांनी तपास सुरू केला

तुम्ही जर ऑनलाईन पार्सल मागवलं आणि त्या पार्सल मध्ये तुम्ही मागवलेली वस्तू न येता काहीतरी भलतं आलं तर? तुमचा भ्रमनिरास होईल बरोबर ना? अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना अमेरिकेत घडली आहे. एका महिलेने तिची काही औषध मागवली होती. मात्र तिला आलेल्या ऑनलाईन बॉक्समध्ये औषध नव्हती. या बॉक्समधली वस्तू बघून महिलेच्या काळजाचा ठोका चुकला. महिलेला त्या बॉक्समध्ये माणसाची कापलेली बोटं सापडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका महिलेने तातडीची काही औषध मागवली होती. बॉक्सची डिलिव्हरी झाली तेव्हा तिने उघडून पाहिलं असता त्या बॉक्समध्ये औषध नव्हती. बॉक्समधील वस्तू पाहून महिलेची झोप उडाली. त्या बॉक्समध्ये दोन हात आणि कापलेली बोट ठेवण्यात आली होती. सुरुवातीला या महिलेला वाटलं कि हॅलोविनच्या निमित्ताने तिला कोणीतरी घाबरवत आहे. मात्र तिने अधिक निरखून पहिले असता ती घाबरली. तिने तातडीने पोलिसांना कळवले.

Shocking News : धक्कदायक! महिलेने ऑनलाईन मागवलेली औषधं, पार्सल उघडताच उडाली झोप , नेमकं काय घडलं?
Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

पोलिसांनी या घटनेचा शोध सुरु केला. तापसादरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषध नॅशव्हिल विमानतळावर पोहोचले आणि ते महिलेच्या घरी पोहोचवण्यात येणार होते. पोलिसांनी डिलिव्हरी कंपनीशी बोलले तेव्हा त्यांनी कबूल केले की एक बॉक्स चुकून महिलेच्या घरी डिलिव्हर झाला.

Shocking News : धक्कदायक! महिलेने ऑनलाईन मागवलेली औषधं, पार्सल उघडताच उडाली झोप , नेमकं काय घडलं?
Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

अमेरिकेत, मानवी अवयव बहुतेकदा संशोधन किंवा प्रत्यारोपणाच्या उद्देशाने बॉक्समध्ये भरले जातात आणि विमानाने पाठवले जातात. तथापि, ते चुकीच्या पत्त्यावर पोहोचणे दुर्मिळ आहे. या घटनेनंतर, पोलिसांनी असे पार्सल मिळाल्यानंतर घाबरण्याऐवजी ताबडतोब पोलिसांना कॉल करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com