Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?

Kerala Munnar Tourism : केरळ मधील मुन्नार येथे मुंबईच्या एका महिला पर्यटकावर टॅक्सीचालकांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी तीन टॅक्सीचालकांना अटक केली आहे.
Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?
Kerala Munnar TourismSaam Tv
Published On
Summary

मुन्नारमध्ये मुंबईच्या महिला पर्यटकावर टॅक्सी चालकांचा विनयभंग

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन टॅक्सी चालकांना अटक

पोलिसांवर स्थानिक ड्रायव्हर्सची बाजू घेतल्याचा आरोप

केरळ पर्यटन मंत्र्यांनी घटनेला लाजिरवाणी घटना म्हटली आहे

केरळ मधून धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. केरळमधील लोकप्रिय हिल स्टेशन मुन्नारमध्ये मुंबईतील एका महिला पर्यटकावर टॅक्सी चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईची रहिवाशी असणाऱ्या जान्हवी नावाच्या एका तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जान्हवी ही असिस्टंट प्रोफेसर आहे. तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, मुंबईहून ३० ऑक्टोबर रोजी मुन्नारमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक टॅक्सी चालकांनी तिची ऑनलाइन बुक केलेली कॅब थांबवली. त्यानंतर स्थानिक टॅक्सी ड्रॉयव्हर्सने तिला धमकावले आणि सांगितले की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुन्नारमध्ये ऑनलाइन टॅक्सी सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?
Powai Hostage Case : पवईतील ओलिसनाट्य प्रकरणात चौकशीचा फास आवळला; सेलेब्रिटी कलाकारांसह बड्या राजकीय नेत्याची चौकशी होणार

स्थनिक टॅक्सी चालकांना जान्हवीने सांगितले की, तिने कोची आणि अलाप्पुझा येथे ऑनलाइन टॅक्सी बुक केल्या होत्या आणि त्याच कॅबने मुन्नारला पोहोचली होती. तथापि, ड्रायव्हर्सनी तिला पुढे जाऊ न देता स्थानिक टॅक्सी घेण्यास भाग पाडले. व्हिडिओमध्ये जान्हवीने असाही आरोप केला आहे की, जेव्हा तिने स्थानिक पोलिसांची मदत मागितली तेव्हा त्यांनी स्थानिक ड्रायव्हर्सची बाजू घेतली.

Kerala Tourist News : मुंबईच्या तरुणीचा केरळमध्ये विनयभंग, तीन टॅक्सी चालक अटकेत, नेमकं काय घडलं?
IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

या घटनेनंतर जान्हवीने पुढे न जाता घरी परत येण्याचा निर्णय घेतला. संबंधित पीडित तरुणीने या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत तीन टॅक्सी चालकांना ताब्यात घेतले आहे. पर्यटक तरुणीला धमकी देणाऱ्या टॅक्सी चालकांनाविरोधात दमदाटी करणे तसेच बंधने घालणे याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घडलेली ही घटना लाजस्पद असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियास यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com