IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

IMD Weather Update News : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा भारतात मध्यम स्वरूपाची थंडी असणार आहे. IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, २०२५ चा हिवाळा हा सौम्य आणि मध्यम स्वरूपाचा राहणार आहे.
IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Weather Update NewsSaam Tv
Published On
Summary

भारतात मध्यम स्वरूपाची थंडी असणार

हवामान खात्याने 'तीव्र हिवाळा'च्या अफवांवर उत्तर दिले

यंदा दिवसाचे तापमान किंचित कमी, रात्रीचे तुलनेने मध्यम स्वरूपाचे असणार

‘ला निना’ आणि ‘आयओडी’ सामान्य झाल्याने सौम्य थंडी पडणार

भारतावर काही दिवसांपूर्वी दुहेरी चक्रीवादळाचं संकट ओढवलं होत. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. मात्र भारतात तीव्र थंडी पडणार असल्याच्या अफवा पसरत होत्या. या अफवांवर भारतीय हवामान खात्याने उत्तर दिले आहे. IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, मागील वर्षांप्रमाणेच यंदाचा हिवाळा हा सौम्य असणार आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काही दिवसात थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे. यावेळी दिवसाचे तापमान इतर दिवसांपेक्षा थोडे कमी असेल, तर रात्रीचे तापमान इतर दिवसांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणा आणि राजस्थान सारख्या भागात रात्री तुलनेने थंड जाणवेल परंतु एकूणच, उत्तर भारतात तीव्र थंडी फारशी जाणवणार नाही.

IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Belgaum Black Day : बेळगावात काळा दिवस; महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारविरोधात निषेध, शिवसेना नेत्यांना प्रवेशबंदी

IMD चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, "येत्या काही दिवसांत थंडीची चाहूल लागेल. तसेच ही थंडी सौम्य असणार आहे. तीव्र राहणार नाही. दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये उत्तर भारतात सामान्यतः तीव्र थंडी पडते. या थंडीचा परिणाम संपूर्ण प्रदेशात जाणवतो, ज्यामुळे लोकांचे जीवन आणि दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होतात. जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे, ज्यामुळे थंडीची लाट निर्माण झाली आहे.

IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Rain Alert : पावसाचा मुक्काम आणखी वाढला,नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

भारतात यंदाचा हिवाळा खूप कडक किंवा खूप सौम्य असणार नाही. तो मध्यम स्वरूपाचा असणार आहे. दिवसा वातावरण थोडे थंड असेल, परंतु रात्री तुलनेने वातावरण मध्यम थंड स्वरूपाचे असणार आहे . 'ला निना' कमकुवत होत असल्याने आयओडी हळूहळू सामान्य होत आहे. म्हणूनच, हवामान खात्याने लोकांना 'तीव्र हिवाळा' असल्याच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com