Uddhav Thackeray vs Eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

shiv sena split rumours intensify in maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठं वादळ येण्याची शक्यता असून, त्याचा तडाखा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे खासदार फुटणार असून, ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं विधान शिंदेसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केलं आहे.

Nandkumar Joshi

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये झालेलं बंड, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार असल्याच्या शक्यता, एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा राजकीय वर्तुळात चवीने चघळल्या जात असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ येणार असून, त्याचा जबरदस्त तडाखा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंचे सात खासदार एकनाथ शिंदेंसोबत येणार असल्याचा दावा शिंदेसेनेचे नेते भरत गोगावलेंनी केला आहे. दुसरीकडं, मातोश्रीवर उद्या, रविवारी खासदारांची तातडीने बैठक होत असल्यानं या चर्चांना बळ मिळालं आहे.

भरत गोगावले काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार असल्याची चर्चा असतानाच, मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. यावर शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते लोक आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, असे गोगावले म्हणाले.

आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. ज्यांनी आमच्याकडे येण्याचा विचार केलाय, तो मनापासून केला आहे. आता ते थांबतील असे वाटत नाही. ते सातही खासदार लवकरच शिंदेसाहेबांच्या सानिध्यात येतील, असे गोगावले म्हणाले.

पक्षनेतृत्व म्हणून जबाबदारी असल्यानं बैठक बोलावली असेल. परंतु, मला वाटत नाही की ज्यांनी विचार केला आहे ते थांबतील. पाणी डोक्यावरनं गेलंय. काही दिवसांत ते बघायला मिळेलच. त्यांनी बैठक घेतली तरी त्यांनी अंतिम विचार केला आहे. खासदार लवकरच शिंदेंच्या सोबत येतील अशी खात्री आहे, असा दावाही भरत गोगावलेंनी केला.

खासदारांच्या बैठकीत काय होणार?

मुंबईत मातोश्रीवर खासदारांची बैठक होणार असून, त्यात नेमकी काय चर्चा होणार आहे, याबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ऑपरेशन टायगरवरून राऊतांनी एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे. ऑपरेशन टायगर म्हणणाऱ्यांचं अमित शहांनी १०० वेळा ऑपरेशन केलंय, असं राऊत म्हणाले.

हा फुटणार, तो फुटणार या अफवा सातत्याने पसरवल्या जात आहेत. जे म्हणतात ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं अमित शहांनी १०० वेळा ऑपरेशन केलंय. तो सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे का? अमित शहांचा पक्ष आहे. ती शिवसेना आहे का? पक्ष फोडणं, माणसं फोडणं, विकत घेणं ही विकृती आहे, असे राऊत म्हणाले.

मातोश्रीवर अशा बैठका नेहमीच होत असतात. खासदारांची उद्या बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, जिल्ह्यातील प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या निधीचा विषय आहे. उद्या ९ खासदारांना बोलावून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT