माजी मंत्री मधुकरराव पिचड साम टीव्ही
महाराष्ट्र

Madhukar Pichad: मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक, नाशिकमध्ये उपचार सुरू

Maharashtra Political News: माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना आज सकाळी ब्रेन स्ट्रोक आला. त्यांच्यावर सध्या नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

भाजपचे नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली आहे. मधुकर पिचड यांची तब्येत अत्यवस्थ झाली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. राजूर येथील राहत्या घरी असताना पिचडांना ब्रेनस्ट्रोक आला. मधुकरराव पिचड 84 वर्षांचे आहेत.

प्रकृती खालावल्यानंतर मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मधुकरराव पिचड यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलगा वैभव पिचडांसह संपूर्ण कुटुबीय सध्या रूग्णालयात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील राजूर येथील घरी असताना मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना तातडीने नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मधुकर पिचड यांना अर्धांगवायूचा त्रास झाल्याची माहिती समोर आळी आहे. मधुकर पिचड यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली असून मेंदूत रक्तस्राव झाल्याची माहिती आहे. सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती मिळणार असून मुलगा वैभव पिचड याच्यासह कुटूंबीय रूग्णालयात उपस्थित आहेत.

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड शरद पवारांचे जुने सहकारी आणि खंदे समर्थक असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते. मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि २०१४ पर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे ते आमदार राहिलेले आहेत. २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुलगा वैभव पिचड हे अकोले विधानसभेचे आमदार झाले. मात्र २०१९ ला पिचड पिता - पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. ऐनवेळी शरद पवारांनी किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि पिचड यांच्याविरोधात प्रचाराचे रान उठवल्याने २०१९ साली वैभव पिचड यांचा पराभव झाला.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार किरण लहामटे यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत ते अजित पवारांसोबत गेले. मात्र महायुतीत एकत्र असल्याने मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांची राजकीय अडचण झाली आहे. उमेदवारी करण्यासाठी वैभव पिचड इतर पर्यायांची चाचपणी करत असून मधुकर पिचड यांनी नुकताच शरद पवारांची भेट घेतल्याने त्यांच्या घर वापासीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पिचड यांची पुन्हा शरद पवारांकडे घर वापसी होणार की भाजपवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे याबाबतही राजकीय आराखडे बांधले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी मधुकर पिचड यांनी भंडारदरा धरणाच्या नामकरण सोहळ्यास हजेरी लावली होती. तर माझे वय ८४ झाल्याने मी राजकारणात थांबलो असून केवळ मुलाच्या राजकीय भविष्यासाठी सक्रीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आज पहाटे अचानक त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मधुकर पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पिचड कुटुंबियांच्या राजकीय भूमिकेकडे अकोले विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. तर कार्यकर्त्यांकडून मधुकर पिचड यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT