Maharashtra Politics : भाजपचा 'तो' प्रस्ताव CM शिंदेंनी धुडकावला? जागावाटपावरुन महायुतीत नेमकं काय घडतंय?

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा जागावाटपाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याची माहिती आहे.
भाजपचा 'तो' प्रस्ताव CM शिंदेंनी धुडकावला? जागावाटपावरुन महायुतीत नेमकं काय घडतंय?
Mahayuti Saam TV
Published On

Mahayuti Seat Sharing : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन जोरदार बैठका सुरु आहेत. आगामी निवडणुकीत भाजपने १५० हून अधिक जागा लढवण्याचे ध्येय ठेवलं आहे. यासाठी त्यांनी शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाला जागावाटपाचा प्रस्ताव देखील दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावल्याची माहिती आहे.

भाजपचा 'तो' प्रस्ताव CM शिंदेंनी धुडकावला? जागावाटपावरुन महायुतीत नेमकं काय घडतंय?
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' जाहिरातीसाठी सरकारने खर्च केले 'इतके' कोटी रुपये; माहिती अधिकारातून सत्य समोर

त्यामुळे महायुतीत दिवाळीपूर्वीच वादाचे फटाके फुटण्याची शक्यत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भाजपने मित्रपक्षांना १६०-८०-५० जागांचा प्रस्ताव दिला होता.

सुरुवातीला या प्रस्तावावर मित्रपक्षांनी सहमती दर्शवली. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट आगामी निवडणुकीत ९० जागांसाठी आग्रही आहे. दुसरीकडे अजित पवार गटाला देखील अधिकच्या जागा हव्या आहेत. यामुळेच महायुतीत ४० जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, जागावाटपाचा हा तिढा दिल्ली दरबारी सोडला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील तिन्ही महत्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावल्याची माहिती आहे. येत्या आठवड्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाची मागणी पूर्ण होणार आणि कुणाचा हिरमोड होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या म्हणजेच बुधवारी अंतिम होणार आहे.

भाजपचा 'तो' प्रस्ताव CM शिंदेंनी धुडकावला? जागावाटपावरुन महायुतीत नेमकं काय घडतंय?
Maharashtra Politics : अजितदादांनी फोडला काँग्रेसचा दिग्गज नेता; विधानसभेआधी राष्ट्रवादीची ताकद वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com