Shreya Maskar
हिवाळ्यात चटपटीत खावेसे वाटत असेल तर फक्त १० मिनिटांत पालक पत्ता चाट बनवा. सिंपल रेसपी आताच नोट करा.
पालक पत्ता चाट बनवण्यासाठी पालकाची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लाल तिखट, जिरे, चाट मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पालक पत्ता चाट बनवण्यासाठी पालकाची पाने स्वच्छ धुवून वाळून घ्या. पाने जास्त मोठी घेऊ नका.
बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, मीठ आणि लाल तिखट घालून चांगले मिक्स करा. मिश्रणात पाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करा.
पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात बेसनच्या पीठात घोळवलेली पालकाची पाने गोल्डन फ्राय करा. पाने जळणार नाही, याची काळजी घ्या.
पालकाची पाने एका ताटात व्यवस्थित पसरवून त्यावर चाट मसाला, हिरवी चटणी, गोड चटणी पसरवा. तुम्हाला आवडणारे मसाले देखील यात टाका.
त्यानंतर यात साखर, दही, लाल तिखट आणि भाजलेले जिरे टाका. तुम्ही यात वरून चाट मसाला देखील भुरभुरवा.
शेवटी यात बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि डाळिंबाचे दाणे घालून पालक पत्ता चाटचा आस्वाद घ्या.