Shreya Maskar
हिवाळ्यात मुलांच्या डब्याला पौष्टिक पदार्थ आवर्जून द्या. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. गावाकडे बनवतात तशी घोसाळ्याची भाजी आणि भाकरी हा देखील डब्याचा हेल्दी मेन्यू आहे.
घोसाळ्याची भाजी बनवण्यासाठी घोसाळी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, कांदा-लसूण मसाला, हळद, मीठ, शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर आणि तेल घालून चांगले परतून घ्या.
घोसाळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम घोसाळ्याची साल काढून मध्यम आकाराचे तुकडे करा. जास्त मोठे तुकडे करू नका. नाहीतर मुलं खाणार नाही.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाकून छान फोडणी करा. यात तुम्ही इतर खडे मसाले देखील टाकू शकता.
फोडणी चांगली तडतडली की, त्यात चिरलेला कांदा गोल्डन फ्राय होईपर्यंत परता. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
या भाजीत आलं-लसूण पेस्ट घालून एक वाफ काढून घ्या. भाजीला तेल सुटू लागल्यावर यात हळद, कांदा-लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करा.
त्यानंतर ५-६ मिनिटे भाजी शिजवून त्यात घोसाळ्याचे तुकडे आणि पाणी घाला. तुम्ही यात थोडे बटाटे देखील टाकू शकता. जेणेकरून लहान मुलं आवडीने खातील.
शेवटी भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट आणि कोथिंबीर घालून गरमागरम भात किंवा चपातीसोबत खा. ही रेसिपी प्रामुख्याने गावाकडे बनवली जाते.