Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात खास चटपटीत विदर्भ स्पेशल पदार्थ बनवा. साधी-सोपी डाळ भाजी कशी बनवावी, जाणून घेऊयात. साहित्य आणि कृती लिहा.

Dal Bhaji | google

डाळ भाजी

डाळ भाजी हा विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ आहे. एक ताट भरून डाळ भाजी आणि भात खाल्यावर पोट भरून जाते आणि मन देखील तृप्त होते.

Dal Bhaji | google

विदर्भ स्पेशल-डाळ भाजी

डाळ भाजी बनवण्यासाठी चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, पालक, शेंगदाणे, टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या, आल-लसूण पेस्ट, कढीपत्ता, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, हळद, हिंग, काळा मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Dal Bhaji | google

चण्याची डाळ

डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम चण्याची डाळ, मूग डाळ, तूर डाळ आणि शेंगदाणे दोन तास भिजत ठेवा.

chana dal | yandex

शेंगदाणे

कुकरमधे तेल टाकून त्यात मोहरी, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, दाण्याचे कूट, धणे पूड, जिरे पूड, हळद, लाल तिखट, लसूण घालून छान फोडणी करून घ्या.

Peanuts | yandex

टोमॅटो

फोडणीत धुतलेल्या डाळी घालून चांगले परतून घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेला पालक, टोमॅटो परतून घ्या. मिश्रणाला छान तेल सुटायला पाहिजे.

Tomatoes | yandex

पाणी

शेवटी कुकरमध्ये १ कप पाणी टाकून भाजी १०-१५ मिनिटे चांगली शिजवून घ्या. त्यानंतर थोडा वेळ कुकर थंड करून घ्या.

Water | yandex

हिरवीगार कोथिंबीर

कुकर थंड झाल्यावर त्यात एका बाऊलमध्ये डाळ भाजी काढून वरून हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा. गरमागरम भातासोबत डाळ भाजीचा आस्वाद घ्या.

Green coriander | yandex

NEXT : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Matar Karanji Recipe | yandex
येथे क्लिक करा...