Matar Karanji Recipe : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Shreya Maskar

मटार करंजी

मटार करंजी बनवण्यासाठी मटार, बटाटा, मैदा, मीठ, तूप, पाणी, आलं, हिरव्या मिरच्या, खोबऱ्याचे तुकडे, तेल, हिंग, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर , कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Matar Karanji | yandex

मैदा

मटार करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कणीक मळा. एका बाऊलमध्ये मैदा, चवीनुसार मीठ, साजूक तूप आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे.

Flour | yandex

मऊ कणीक

तयार कणीक १० ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्यावे. ज्यामुळे पीठ चांगले मुरेल आणि पदार्थ चांगला बनेल.

Soft dough | yandex

बटाटा

कुकरमध्ये हिरवे मटार आणि बटाटे उकडवून घ्या. उकडून घेतलेले मटार आणि बटाटे मिक्सरला वाटून घ्या. पेस्ट जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.

Potato | yandex

खोबरं

मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरच्या, खोबऱ्याचे तुकडे घालून बारीक वाटून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.

Coconut | yandex

बटाट्याचे सारण

पॅनमध्ये तेल गरम करून हिंग, मिक्सरला वाटलेले सारण, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, उकडून मॅश केलेले हिरवे मटार आणि बटाट्याचे सारण घालून मिक्स करा.

Potato | yandex

चवीनुसार मीठ

यात कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सारण शिजवून घ्या. सारण शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवा. त्यानंतर मैद्याच्या पीठाचे गोळे करून पारी लाटून घ्या.

Salt | yandex

करंजी तळा

तयार पुरीमध्ये सारण भरून करंजी बंद करा. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून मटार करंजी खरपूस तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत मटार करंजीचा आस्वाद घ्या.

Matar Karanji | yandex

NEXT : थंडीत गरमागरम अन् चटपटीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा मंचाव सूप

Manchow Soup Recipe | yandex
येथे क्लिक करा...