Manchow Soup Recipe : थंडीत गरमागरम अन् चटपटीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा मंचाव सूप

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात थंड वातावरण असते. त्यामुळे आपल्याला कायम गरम आणि चटपटीत खावेसे वाटते. तेव्हा झटपट मंचाव सूप बनवा.

Manchow Soup | yandex

मंचाव सूप

मंचाव सूप बनवण्यासाठी मशरूम, बेबी कॉर्न, कोबी, बिन्स, मिरची, मिरपूड, कॉर्नफ्लॉवर, सोया सॉस, चिली सॉस, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Manchow Soup | yandex

आलं-लसूण पेस्ट

मंचाव सूप बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट चांगली परतून घ्या. त्यानंतर मिश्रणात आवडत्या भाज्या परतून घ्या.

Ginger-garlic paste | yandex

मिरपूड

सूपमध्ये पाणी घालून मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, बेबी कॉर्न टाकून एक उकळी काढून घ्या.

Pepper | yandex

कॉर्नफ्लॉवर

आता छोट्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून मिक्स करा. तयार पेस्ट मंचाव सूपमध्ये टाका.

Cornflower | yandex

लिंबाचा रस

त्यानंतर मिश्रणात ‌मीठ, लिंबाचा रस आणि मिरची घालून एकजीव करा. तुमच्या आवडीनुसार यात तिखट घाला.

Lemon juice | yandex

शेजवान चटनी

मंचाव सूप तुम्हाला आणखी चटकदार बनवायचे असेल तर त्यात शेजवान चटनी देखील टाका. यामुळे चव वाढते.

Shejwan chutney | yandex

नूडल्स

मंचाव सूपला एक उकळी काढून आस्वाद घ्या. यात तुम्ही नूडल्स मिक्स करा. रेस्टॉरंटमध्ये मिळते तसे चटपटीत मंचाव सूप घरी १० मिनिटांत बनेल.

Manchow Soup | yandex

NEXT : मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल 'गुळाचा शिरा', फक्त १० मिनिटांत प्रसाद तयार

Jaggery Sheera Recipe | yandex
येथे क्लिक करा...