Shreya Maskar
मार्गशीर्ष गुरुवार सध्या सुरू आहेत. गुरूवारी उपवासाला, प्रसादाला खास गुळाचा शिरा बनवा. रेसिपी आताच नोट करा.
गुळाचा शिरा बनवण्यासाठी रवा, गूळ, तूप, मावा, ड्रायफ्रूट्स , वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
गुळाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेल्या रव्यामध्ये पाणी घालून ढवळत रहा. जेणेकरून गुठळ्या होणार नाही. गुळाचा शिरा बनवण्यासाठी बारीक रवा वापरा.
पाणी आटल्यानंतर त्यात गूळ, वेलची पूड घालून सर्व मिक्स करा. गूळ तुमच्या आवडीनुसार पॅनमध्ये घ्या.
गुळाचा शिरा शिजला की त्यात ड्रायफ्रूट्स आणि मावा टाकून चांगले परतून घ्या. ड्रायफ्रूट्समध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ घ्या.
शिरा चिकट होऊ नये म्हणून रवा, गूळ आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. शिरा सतत ढवळत राहा जेणेकरून तो पॅनला चिकटणार नाही.
गुळाचा शिरा हा प्रामुख्याने गावाकडे बनवला जातो. सणासुदीला झटपट बनवण्यासाठी हा सिंपल पदार्थ आहे.