Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात अनेकांचे खर्च अनियंत्रित होत चालले आहेत. महिनाअखेर हातात काहीही उरत नाही आणि बचतीचं स्वप्न लांब जातंय. पण काही सोप्या आर्थिक सवयी फॉलो केल्यास बचत पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकते.
महिन्याच्या सुरुवातीलाच खर्चांचे वर्गीकरण करून बजेट बनवा. कुठे जास्त खर्च होतोय हे स्पष्ट दिसतं आणि नियंत्रण ठेवता येतं.
ऑनलाइन शॉपिंग, फूड डिलिव्हरी, सबस्क्रिप्शन, बाहेर खाणे यांसारख्या खर्चांवर लक्ष ठेवा. महिन्यात किमान 2–3 अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
‘Pay Yourself First’ तत्त्व वापरा. पगाराच्या दिवशीच ठराविक रक्कम बचत एसआयपीमध्ये जमा होईल अशी ऑटो डेबिट सेट करा.
उशीर झाल्यास दंड व व्याज वाढतं. वेळेवर भरण्यामुळे क्रेडिट स्कोरही सुधारतो आणि आर्थिक ताण कमी होतो.
बाहेरचं खाणं हे महिन्यातील मोठं खर्चाचं कारण ठरतं. घरगुती जेवणावर भर दिल्यास आरोग्याबरोबरच खर्चातही बचत होते.
प्रत्येक ऑफर फायद्याची असेलच असं नाही. खरंच आवश्यक असलेल्या वस्तूंवरच डिस्काउंटचा फायदा घ्या. OTT, अॅप्स, जिम किंवा इतर सबस्क्रिप्शन वापरत नसल्यास तात्काळ बंद करा. वर्षभरात मोठी बचत होईल.
कार-पूल, सार्वजनिक वाहतूक, सायकलिंग किंवा ऑफिसजवळ राहणे हे पर्याय खर्च कमी करण्यास मदत करू शकतात.
FD, RD, SIP, गोल्ड किंवा पीपीएफ यांसारखे पर्याय निवडा. लहान रक्कमेपासून सुरुवात केली तरी दीर्घकालीन बचत प्रचंड वाढते.