Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वात बुद्धिमान, ज्ञानी आणि दूरदृष्टी असलेले विचारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि जीवनातील वर्तणूक यांचा सखोल अभ्यास करून अनेक निती तयार केल्या.
आजही त्यांच्या शिकवणी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. चाणक्यांनी काही अशा लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांच्या सहवासामुळे आपला वेळ, पैसा आणि उर्जा व्यर्थ जाते. या लोकांपासून दूर राहणेच सुख, प्रगती आणि यशासाठी आवश्यक मानले जाते.
नकारात्मक लोक हे प्रत्येक गोष्टीत कमीपणा, समस्या आणि वाईटच पाहतात. असे लोक आसपास असले की आपली ऊर्जा कमी होते आणि मन निरुत्साहित होते.
कशातही आनंद न मानणारे आणि नेहमीच त्रुटी शोधणारे लोक आपली सकारात्मकता नष्ट करतात. त्यांच्यासोबत राहताना मानसिक थकवा येतो आणि कामावरही लक्ष केंद्रित होत नाही.
चाणक्य म्हणतात, खोटं बोलणारे कधीही विश्वास ठेवण्यासारखे नसतात. अशा लोकांवर विश्वास ठेवला तर आर्थिक तोटा होऊ शकतो.
हे लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि उलट तुमचा वेळ व उर्जा वाया घालवतात. अशांसोबत काम केल्यास पैसा आणि वेळ दोन्हीचं नुकसान होते.
छोटीशी गोष्ट पकडून भांडण करणाऱ्यांसोबत राहिले की रोजचा तणाव वाढतो. वेळ, पैसा, मानसिक शांतता या सर्व गोष्टी हरवत जातात.
ज्यांना तुमची गरज असेल तेव्हाच जवळ राहणारे आणि नंतर गायब होणारे लोक चाणक्यांच्या मते सर्वात घातक. अशा लोकांवर विश्वास ठेवणे मोठी चूक असते.
ज्यांना फक्त स्वार्थ दिसतो ते लोक कोणत्याही नात्याला कधीही तोडू शकतात. अशांच्यामुळे भावनिक व आर्थिक दोन्ही नुकसान होते.