Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, महापरिनिर्वाण दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

- केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ घेणार बैठक

- पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा

- भाजपा महापालिका एकटं लढण्याच्या तयारीत?

- बैठकीनंतर भाजपा प्रवेशांना पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता

- रविवारी सकाळी ९ वाजता होणार बैठक

मुंबईच्या नागपाडा येथे लाकडावाला बाजाराला मोठी आग

लाकडाच्या गोडाऊनला आग लागली असून आजूबाजूला मोठी दाटवस्ती असल्याने भीतीचे वातावरण

अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या येत आगीवर मिळविले नियंत्रण

आगीत कोणतीही जीवित हानी नाही मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान

अकोल्यातल्या 13 वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणात 2 जणांवर गुन्हे दाखल

शाळेतील सीनियर अल्पवयीन विद्यार्थीसह त्याच्या वडिलांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जुने शहर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांसह वडिलांना केली अटक.

मध्य रेल्वेच्या अकोला–नांदेड–सिकंदराबाद मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड.

काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस आणि जयपूर-नांदेड 'हूजूरसाहेब एक्सप्रोस' शिवणी गावाजवळ एक तासापासून खोळंबल्यात. तर थोड्याच वेळात अकोल्यावरून वाशिमकडे जाणारी नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानकातच थांबवावी लागणार. गेल्या तासभरापासून खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल. सिग्नल व्यवस्था दुरूस्तीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू. मात्र, दुरुस्तीला नेमका किती वेळ लागेल? हे स्पष्ट नसल्याने प्रवाशांचा मन:स्ताप.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सरकारचा चहापान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रामगिरी' निवासस्थानी संध्याकाळी चहापान आयोजित करण्यात आला आहे

- हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या चहापणासाठी विरोधीपक्ष नेते,गट नेते आणि विधिमंडळ सदस्यांना आमंत्रित करण्यात आले आहे

- सरकारच्या चहा पानाला विरोधक जाणार की दरवर्षी प्रमाणे बहिष्कार टाकणार याकडे लक्ष

- चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद होणार

सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर बोरामणी गावाजवळ कंटेनरला अपघात

कंटेनर दुभाजकाच्या मधोमध अडकल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट डिव्हायडरवर चढलाय. सोलापूर हैद्राबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. दरम्यान प्रशासनाकडून तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर डिव्हायडरवरून काढण्याचे काम सुरूय.

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार

भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक

लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागा महायुतीने जिंकल्यानं येणारी निवडणूक देखील एकत्र लढण्यावर ठाम

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवण्यात येणार

महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं ठरलं निवडणूक एकत्र लढण्यावर एकमत

नागपुरातील दिघोरी परिसरात गाडीच्या शोरूमला आग

- दिघोरी रिंग रोड परिसरातील जे एम मोटर्स नावाच्या शोरूमला भीषण आग

- आगीत पाच दुचाकी जळल्याची माहिती

- तीन माळ्याच्या इमारतीत खाली हे शोरूम आहे

- खाली शोरूममध्ये आग लागल्याने वरच्या माळ्यावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते

- मात्र सुदैवाने कुठलीही जीवहानी नाही

- अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले,आगीचे कारण अस्पष्ट

नृत्यांगना आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

अहिल्यानगरच्या जामखेड येथील नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दिपाली पाटील हिच्या आत्महत्या प्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपी संदीप गायकवाड याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपालीची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी जामखेड पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक संदीप गायकवाड याच्याविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रायगडमधील तळ तालुक्यातील तळगडावर सापडला गुप्त दरवाजा

शिवप्रेमीं करता आनंदाची बातमी आहे. रायगड मधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड या शिवकालीन किल्ल्यावर गुप्त दरवाजा सापडला आहे. येथील दुर्गरत्न प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता मोहिम राबवली जात होती. या वेळी हा गुप्त दरवाजा सापडला. गुप्त दरवाजा सापडल्यानंतर येथे शिवप्रेमींनी विधीवत पुजा करीत जल्लोश साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. त्यानंतर 1659 साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने या तळगडाला वेढा घातला असल्याची माहिती आहे.

जळगाव जामोद येथील बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना बुलढाणा पोलिसांनी 24 तासात शोधले..

जळगाव जामोद येथील बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलीना बुलढाणा पोलिसांनी 24 तासात शोधले..

पोलिसांनी त्या तीन अल्प वयीन मुलींना ताब्यात घेतले असून ते बुलढाणा कडे रवाना झाले आहेत...

आज सायंकाळ पर्यंत त्या तिन्ही मुली आपल्या कुटुंबा कडे स्वाधीन केल्या जातील..

24 तासात बुलढाणा पोलिसांनी शोधल्याने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे..

त्या तीन अल्पवयीन मुलींना शोधण्यासाठी बुलढाणा पोलिसाचे 5 पथके रावांना करण्यात आले होते....

Nandurbar: देशातील सर्वात मोठा अश्व बाजारात घोड्यांच्या विक्रीत तेजी

देशातील सर्वात मोठा अश्व बाजारात घोड्यांची विक्री तेजित...

सारंगखेडा यात्रेत पहिल्या दोन दिवसातच 117 घोड्यांची विक्री....

घोड्यांची विक्रीतून तब्बल 56 लाखाची उलाढाल ....

सारंखेडा चा घोड्या बाजारात आतापर्यंत तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल...

आतापर्यंत या घोड्या बाजारात सर्वाधिक किमतीची 11 लाख 11 हजार 111 रुपयांची घोडी विक्री झाली आहे..

50 हजारापासून ते दहा कोटी रुपयांत पर्यंतचे घोडे यात्रेत विक्रीसाठी दाखल....

Jamkhed: कलाकेंद्रात काम करणाऱ्या दिपाली पाटिलनं आयुष्य संपवलं

जामखेड येथील कलाकेंद्रात काम करणाऱ्या दिपाली पाटिल या नर्तिकेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती...दरम्यान दिपाली पाटील ज्या कलाकेंद्रात काम करत होती त्या "घुंगरू" कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी सांगितले की, दिपाली पाटील या मागील तीन महिन्यांपासून आमचे काम करत नव्हती मात्र ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हंटलंय...

Mumbai : मालाड मालवणी इथे वातावरण तापण्याची शक्यता

मालाड मालवणी इथे वातावरण तापण्याची शक्यता

के. ई. एम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला आज मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत

मात्र याच ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आहेत

पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे लावण्यात आला आहे

Dhule : धुळ्यात अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर 'एलसीबी'चा छापा

धुळे शहरात घरगुती गॅसचा अवैधरित्या साठा करून वाहनांमध्ये भरणा करणाऱ्या दोन मिनी गॅस पंपांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे, या धडक कारवाईत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेतले असून, गॅस सिलिंडरचा साठा आणि इलेक्ट्रिक मोटर असा मुद्देमाल जप्त केला आहे, शहरातील लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रकाराला पोलिसांनी चाप लावला असून या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत,

Sambhajinagar : नायलॉन मांजाने तीन वर्षीय मुलाचा गळा कापला

छत्रपती संभाजीनगर शहरात एका तीन वर्षीय मुलाचा पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा कापला आहे. गळा कापल्यानंतर गंभीर जखमी झाल्यामुळे सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्वंराश संजीव जाधव असं लहान मुलाचे नाव आहे. सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आई वडिलांसोबत मोटार सायकल वरून जाताना स्वरांश हा समोर बसलेला होता. हर्शुल वरून हे सातारा चालले होते. जकात नाका जवळ जात असताना भरस्त्यात पतंगाचा नायलॉन मांजा समोर आल्यानं समोर बसल्या स्वरांश चा गळा कापला. तातडीने त्याच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

Hingoli : शिक्षकांची बदली होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वरुड गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची वारंवार प्रतिनियुक्ती होत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करत चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेला टाळे ठोकले आहेत, गेल्या अनेक महिन्यांपासून या गावातील पालक शिक्षकांच्या बदल्यांमुळे त्रस्त झाले आहेत दरम्यान आता पुन्हा एकदा शिक्षकांची प्रतिनियुक्ती झाल्याने पालकांनी याचा विरोध करण्यासाठी शाळेला टाळे ठोकत हे आंदोलन केले आहे.

Mumbai : चुनाभट्टी - सायन कनेक्टरजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी

पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची

Sambhajinagar : भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने महाआरती

भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरातील दुपारी हनुमान मंदिर येथे भजन व महाआरती करण्यात आली. राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत भक्तिपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Vileparle: विलेपार्ले रेल्वे स्थानकावर आढळली संशयित बॅग

विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशन येथे बेवारस बॅग सापडली आहे बॉम्ब असल्याची बातमी यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस वाहतूक बंद करण्यात आली आहे व संपूर्ण प्रवास यांना करण्यासाठी बंद करण्यात आली आहे पोलीस तपास करत आहेत बॉम्ब शोध पथक घटनास्थळी आली आहेत

Yeola: येवल्यातील पैठणी दुकानात चोरट्यांची चोरी,सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

नाशिकच्या येवला शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात असलेल्या नाकोड मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी मॉलमधील महागड्या पैठणी साड्या, इतर कापडमाल तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला.चोरीदरम्यान आरोपीने मॉलमधील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हाताने वळवून त्यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. तरीही काही कॅमेऱ्यांमध्ये चोरटा कैद झाला आहे. या अगोदर देखील या नाकोड पैठणी मॉल व दुकानांमध्ये तीन वेळेस चोरी झाली असल्याची माहिती दुकानदार यांनी दिली.तर पोलिस अधिक तपास करत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने महाआरती

भगवा शौर्य दिनानिमित्त शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी परिसरातील दुपारी हनुमान मंदिर येथे भजन व महाआरती करण्यात आली. राम मंदिर निर्माण आंदोलनातील शहिदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत भक्तिपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Parali: परळी नगरपरिषदेसमोर स्ट्रॉंग रूम च्या कारणावरून राडा घालणं पडले महागात

बुधवारी रात्री दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासोबत स्ट्रॉंग रूम च्या कारणावरून वाद घातल्याचा आरोप करत घातला होता राडा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगणे, मोहन मुंडे यांच्यासह अन्य इतर 15 ते 20 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगरपरिषद कार्यालयासमोर विनापरवाना गैर कायद्याची मंडळी जमवून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला गुन्हा

परळी शहर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.

Nashik: नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

- नाशिकमधील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी पाठवली मोदींना पत्र

- तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी पत्र लिहून मोदींना विनंती

- तपोवनातील वृक्ष तोडीला हरकती घेणारी पत्रं पोस्टाने दिल्लीला पाठवली

Sangli: ईश्वरपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणी-भानामतीचा प्रकार

सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे.महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कागदात काळी बाहुली आणि करणीचे साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कपिल ओसवाल व मन्सूर मोमीन हे उमेदवार असून ते राहत असलेल्या सावकार मशीद परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर ईश्वरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून निवडणुकीतून हा प्रकार झाल्याची चर्चा सध्या सुरू असून विरोधी उमेदवारांकडून हा प्रकार करण्याचा आल्याचा आरोप महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय,ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी

इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे

याच स्मारकाची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे

या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून येणाऱ्या दिवसात हे स्मारक पूर्ण होईल - शिंदे

Raigad: मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदाराच्या विरोधात काढली अंत्ययात्रा

० मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याने निदर्शन

० तिरडीची यात्रा काढत सरकार आणि ठेकेदारा विरोधात जोरदार घोषणाबाजी

० रायगडच्या माणगावमध्ये जन आक्रोश समितीने तिरडी यात्रा काढत केला निषेध

Sharad Pawar: शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

पूना हॉस्पिटल मध्ये येत शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

बाबा आढाव यांची प्रकृती खालवल्यामुळे बाबा आढाव यांना पूना हॉस्पिटल येथे उपचारासाठी करण्यात आल आहे दाखल

थोड्याच वेळात शरद पवार बाबा आढाव यांची भेट घेत तब्येतीची माहिती घेणार

Tapovan Trees:  तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पालिका प्रशासनाचं एक पाऊल मागे

- तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आणि हरकत घेणाऱ्या पर्यावरणप्रेमींना बोलावलं चर्चेला

- येत्या सोमवारी दुपारी बारा वाजता पर्यावरणप्रेमींना चर्चेसाठी बोलावलं

- मात्र बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी तपोवनात येऊन खुली चर्चा करावी, पर्यावरण प्रेमींची भूमिका

Pune: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

पुणे ते मुंबई दरम्यान उद्या मेगाब्लॉक विविध एक्सप्रेस रद्द तसेच पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या देखील रद्द

सिंहगड एक्सप्रेस ,डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या देखील उद्या रद्द

पुणे मुंबई या मार्गावर धावणाऱ्या एकूण 17 रेल्वे रद्द होणार

प्रवाशांचे होणार हाल

Nashik: नाशिक महापालिकेची वृक्षारोपणाची तयारी

- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना नाशिक महापालिकेची वृक्षारोपणाची तयारी

- नाशिकमधल्या सेंट्रल पार्क, कानिटकर उद्यान, गंगापूर गाव परिसरात १५ हजार झाडं लावणार

- राजमुंद्रीवरून आणली जाणार झाडं

- तब्बल १५ फुटांची वेगवेगळ्या देशी प्रजातीची झाडं राजमुद्रीवरून आणली जाणार

- पुढील आठवड्यात नव्याने लावली जाणारी झाड नाशिक मध्ये येण्याची शक्यता

Lonavala: लोणावळ्यात टायगर पॉईंटजवळ भीषण अपघात

गोवा येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा अपघातात दुर्दैव मृत्यू लोणावळ्यात झाल्याची घटना पुढे आली आहे. लोणावळ्या हुन सहारा सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवलिंग पॉईंट येथे भरधाव स्विफ्ट कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली कारचा वेग अनियंत्रित असल्याने धडक एवढी भीषण होती की स्वीफ्ट कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे या अपघातात कारचालक योगेश सुतार वय 21 राहणार म्हापसा गोवा तसेच त्याच्यासोबत असलेला मयूर वेंगुळकर वय 24 राहणार म्हापसा गोवा यांना गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने दोघांचा अपघातात मृत्यू झाला लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी दाखल झाले असेल. अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे करत आहेत..

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी भाजपकडून २२ प्रभागात तब्बल ९१० उमेदवार इच्छुक

उमेदवार निवडताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार

भाजपने २९ प्रभागांतील ११५ पैकी ८८ वॉर्डासाठी तब्बल ९१० इच्छुकांची यादी तयार केली आहे. ही यादी दोन दिवसांत प्रदेश कार्यालयास सादर केली जाणार आहे

यंदा महापालिका निवडणुका या वॉर्डऐवजी प्रभाग पद्धतीने होत आहेत. एका प्रभागात ४ वॉर्डाचा समावेश असून, यातील एका वॉर्डासाठी भाजपकडे ९ ते ११ इच्छुक आहेत.

भाजप २९ पैकी १८ प्रभाग हे हिंदू-दलितबहुल भागात मोडतात. उर्वरित ११ प्रभाग हे मुस्लिम-दलित प्रभागात मोडतात. त्यामुळे यातील २२ प्रभागांत म्हणजे ८८ वॉर्डामध्ये भाजपची तयारी सुरू आहे.

या ८८ वॉर्डामध्ये भाजपकडे तब्बल ९१० इच्छुक उमेदवार असून, या इच्छुकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी येत्या दोन दिवसांत शहर भाजपकडून प्रदेश कार्यालयाला सादर केली जाणार आहे.

Jalgaon: जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तीनही मुली टेक्निकल क्लासला जातोय असं घरी सांगून निघाल्या होत्या. त्या जळगाव जामोद बस स्थानकात मैत्रिणींना दिसल्याही होत्या. मात्र त्यानंतर त्या तीनही मुली अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलिसात दाखल केली आहे. यावरून जळगाव जामोद पोलिसांनी शोध घेतला असता या मुली कुठेही आढळून आल्या नाहीत. आता जळगाव जामोद पोलिसांसमोर या मुलींना शोधण्याच मोठा आव्हान उभ राहिल आहे. तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे व चंचल श्रीकृष्ण मोहे (सर्वांचं वय 16)अस या तिन्ही अल्पवयीन मुलीचे नाव असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावच्या आहेत. या तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik: तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी आता मनसे देखील मैदानात

- तपोवनातील वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेल्या आंदोलनात मनसेची देखील उडी

- तपोवनातील वृक्षतोडीविरोधात मनसेचं आंदोलन

- मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोतकर आणि शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी कलाकार सेव्ह तपोवन मोहिमेत सहभागी

- सायली संजीव, संतोष जुवेकर, अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांच्यासह अन्य मराठी कलाकार तपोवन वाचवण्यासाठी मैदानात

Beed: आज बीड-वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी

आज बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार आहे. त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील 30 किलोमीटर म्हणजेच वडवणी पर्यंत आज रेल्वे इंजिन चाचणी होत आहे. या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्याने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा आणि रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत या रेल्वे चाचण्या पूर्ण होणार आहेत.

Nashik: तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

नाशिक -

- तपोवनातील साधुग्राम परिसरातील साफ सफाईला सुरुवात

- साधूग्राम परिसरातील मलबा उचलण्यास सुरुवात

- नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडा रोडा उचलण्यास सुरुवात

- नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेला आली जाग

- एकीकडे तपोवन आतील वृक्षतोडीचा मुद्दा पेटलेला असतानाच दुसरीकडे तपोवन परिसरातील साफसफाईला सुरुवात

Dharashiv: शिंदे शिवसेना आणि काँग्रेसच्या युती प्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निलंबनाचे पत्र निघाले बनावट

धाराशिव -

शिंदे शिवसेना आणि काँग्रेसच्या युती प्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निलंबनाचे पत्र निघाले बनावट, जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांची पत्राद्वारे माहिती, बनावट पत्र प्रकरणी नेमण्यात आली चौकशी समिती

बनवट पत्राच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांचे निलंबन केल्याची देण्यात आली होती माहिती

धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेबरोबर युती केल्याने युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे निलंबन केल्याचे पत्र करण्यात आले होते प्रसिद्ध

Pune: प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला

पुणे -

प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला

महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती नको प्रशांत जगताप यांनी घेतली आहे भूमिका

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा काही निर्णय झाला तर मी माझं राजकारण सोडेन अस प्रशांत जगताप यांनी सांगितल होत

त्यानंतर प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटीला बोलावले आहे

Pune: पुण्यातील इंडिगोची आज दिवसभरातील ४२ विमान उड्डाण रद्द

पुणे -

पुण्यातील इंडिगोची आज दिवसभरातील ४२ विमान उड्डाण रद्द

१४ पुण्यात येणारी आणि २८ पुण्याहून विविध शहरात जाणारे विमान रद्द

एयरपोर्ट अथॉरिटीकडून माहिती

आज चार नंतर इंडिगोच्या विमानाच उड्डाण होणार होत मात्र आधी उशिराने उड्डाण होणार होते मात्र आता सगळे उड्डाण रद्द करण्यात आले आहे

त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे

प्रवाशांना पर्यायी प्रवासाची सोय करावी लागणार आहे

Buldhana: उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती भोसले यांनी घेतले श्री समाधीचे दर्शन

बुलडाणा -

उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती भोसले यांनी घेतले श्री समाधीचे दर्शन...

शेगावात प्रथमच येऊन संस्थानाचे केले कौतुक..

रजत नगरी खामगावला देखील दिली भेट

Pune: पुण्यात एका डेटा कंपनीत डेटा चोरी केल्याचा माजी कर्मचाऱ्यावर आरोप

पुणे-

पुण्यात एका डेटा कंपनीत डेटा चोरी केल्याचा माजी कर्मच्यावर आरोप

केंद्र सरकारला सेवा देणाऱ्या कंपनीतील प्रकारात आला समोर

संवेदनशील डेटा चोरी केल्याच्या आरोपावरून चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संबंधित कंपनी ही केंद्र सरकारच्या भारतीय सेना , वायुदल, नौदल , सरकारी आय टी विभाग इतर संवेदनशील विभागाचा डेटा निगडित आहे

माजी कर्मचाऱ्यावर हा डेटा चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे

Amravati: सुस्थितीत असलेल्या पेव्हर ब्लॉकवरच चक्क काँक्रिटीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला

अमरावती -

- सुस्थितीत असलेल्या पेव्हर ब्लॉकवरच चक्क काँक्रिटीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उघडकीस...

- सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप...

- आरोग्य सचिवांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीव अधिकाऱ्यांसाठी रेट कार्पेट अंथरताना सामान्य नागरिकांच्या पैशांचा असा चुराडा सुरू...

- पेव्हर ब्लॉकवरच काँक्रिटीकरण सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने नियोजन बांधकाम व आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त, जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी..

Nagpur: हिवाळी अधिवेशन सोमवारपासून, पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार.

नागपूर -

- हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार, पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार.

- अधिवेशनात एकूण ११ विधेयके, ६ अध्यादेश तर ५ नवीन विधेयके पटलावर ठेवणार

- फक्त ७ दिवसांचे अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार रविवारीही कामकाज होणार

- कामकाज रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता, प्रशासन, सचिवालय आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज.

- मंत्र्यांसाठी १६ नवी दालने, रस्ते इमारतींची कामे अंतिम टप्प्यात.

Nagpur: इंडीगो ठप्प झाल्याने इतर विमान कंपन्यांच्या तिकिटाचे दर गगनाला

नागपूर

- इंडीगो ठप्प झाल्याने इतर विमान कंपन्यांच्या तिकिटाचे दर गगनाला

- एअर इंडियाने नागपूर मुंबई, नागपूर दिल्ली जाण्यासाठी २५ हजार ते ४० हजारांपर्यंत दर आकारले

Dombivli: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण एकत्र येणार का?

डोंबिवली -

उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण एकत्र येणार का?

केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकूलाचे भूमीपूजन आणि सावत्रीबाई नाट्यगृहाचे नूतनीकरण

डोंबिवलीत शनिवारी चार वाजता होणार कार्यक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण हे देखील प्रमुख पाहुणे

चव्हाण यांची उपस्थिती लाभणार का याकडे सगळ्याचे लक्ष

नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीत पक्ष प्रवेशावरुन झाला होता वाद

Nagpur: नागपूर शहरात थंडीची हुडहुडी वाढली, पारा घसरला

नागपूर -

- नागपूर शहरात थंडीची हुडहुडी वाढली, पारा घसरला

- नागपूर शहराचा पारा 10.8 अंशावर

- कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हवेत वाढला गारवा

- पुढील आठवड्यात शहरात थंडीची लाट कायम असण्याचा हवामान विभागाचा अंदाज

- पश्चिम उपसागरातील चक्रीवादळ कमजोर पडू लागल्याने व उत्तरेकडील मैदानातील भागांकडे गारठवारे वाहू लागल्याने विदर्भात थंडीची लाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com