MNS FACES MAJOR SETBACK IN RAIGAD AS HUNDREDS OF WORKERS RESIGN, LIKELY TO JOIN SHINDE SENA Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ, लवकरच शिंदेसेनेत करणार प्रवेश

Raigad MNS Leader Sandeep Thakur Resigns : रायगड जिल्ह्यात मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून ते लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे.

Alisha Khedekar

  • मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

  • पक्षाच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली

  • राजीनामा दिलेले बहुतांश कार्यकर्ते शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत

  • महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठ दिवसांत प्रवेश होण्याची शक्यता

सचिन कदम, रायगड

Maharashtra Raigad Pen MNS Leader Sandeep Thakur Resigns एकीकडे राज्यात उबाठा गटात गटफुटी होत असताना दुसरीकडे रायगडमध्ये मनसेला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे सर्व राजीनामे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आले असून हे कार्यकर्ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

साम टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यात अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मनसेचे संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पक्ष संघटनेत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे माहिती आहे. दरम्यान, राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांपैकी बहुतांश जण येत्या आठ दिवसांत शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यातील मनसेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसू शकतो.

पेण तालुक्यातील या सामूहिक राजीनाम्यांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मनसे नेतृत्व या घडामोडींकडे कशा प्रकारे पाहते आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा परिणामांना पोलिस प्रशासन जबाबदार - लक्ष्मण हाके

फक्त 32 रुपयांत पेट्रोल-डिझेल! गुजरातमध्ये भन्नाट शोध, 60 अ‍ॅव्हरेजचा दावा

Heartburn: रात्रीच्या वेळेस हार्टबर्नचा त्रास अधिक का होतो?

High blood sugar: शरीरात ही ५ लक्षणं अचानक दिसली तर समजा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतंय

महिलांनो सावधान! अति रक्तस्त्राव असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण; करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT