Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: भाजपचा हस्तक्षेप, शिंदे गटाचा आक्षेप?, स्ट्राईक रेट वाढला, सगळा हिशोब काढला

Maharashtra Politics: लोकसभा निकालानंतर शिंदे गट भाजपविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदे गटातली जागा वाटपाच्या काळातली खदखद आता जाहीरपणे बाहेर येऊ लागलीय.

Priya More

विनोद पाटील, साम टीव्ही

लोकसभा निकालानंतर शिंदे गट भाजपविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदे गटातली जागा वाटपाच्या काळातली खदखद आता जाहीरपणे बाहेर येऊ लागलीय. भाजपच्या हस्तक्षेपाला शिंदे गटानं आक्षेप घेतलाय. नेमकी ही अस्वस्थता का बाहेर पडली आणि महायुतीत नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जागा वाटपात बॅकफूटवर गेलेला शिंदे गट निकालानंतर चांगलाच आक्रमक झालाय. महायुतीच्या जागावाटपापासून उमेदवारांच्या निवडीपर्यंत काही प्रतिष्ठेच्या जागांवर अखेरपर्यंत घोळ घातल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल चार जागांचा फटका बसल्याचं दुसरं तिसरं कुणी नव्हे तर थेट शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच बोलून दाखवलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, 'रामदासभाई आपण आणखी ३-४ जागा नक्की जिंकलो असतो. त्या जागा ५ जागा. माझा विश्वास होता. आपण का जागा हारलो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही.'

भाजपला २८ जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवता आला. तर शिंदेंच्या शिवसेनेनं १५ जागा लढवून सात जागांवर विजय मिळविला. त्यामुळे शिंदे गटाचा स्ट्राईक रेट भाजपच्या दुप्पट आहे. त्यामुळे शिंदे गटात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागलाय. सर्वेक्षणाच्या नावाखाली शिंदे गटातल्या यवतमाळच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील आणि रामटेकचे कृपाल तुमाणे या तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं.

तर नाशिकमध्ये अखेरपर्यंत हेमंत गोडसेंच्या तिकीटचा घोळ घालण्यात आला होता. त्याचा फटका बसल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलाय. तसंच भाजपच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत यापुढे मोदी आणि शाहांसोबत चर्चेसाठी आपल्याला नेत चला अशी गळच त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातली...तर उमेदवारी कधी जाहीर होते याचा जय पराजयाशी संबंध नसल्याचा दावा भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केलाय.

शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सांगितले होते की, 'आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा. आपल्याला हात जोडून विनंती आहे. मला माहिती आहे कोणी बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदीसाहेब आणि शहा साहेबांकडे. मी सांगेल साहेब जसे भाजपचे २ महिन्याआधी उमेदवार दिले. तसे शिंदेसाहेबांचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले असते तर आज चित्र वेगळे असते. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार शिंदे साहेबांनी जाहीर केला की भाजपचे मंडळी उटली आमची जागा आमची जागा करत. साहेब हे थांबवा.'

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'अशा वेगवेगळ्या प्रकारची गणितं राजकारणामध्ये मांडली जातात. याचा अर्थ असा नाही की तेच डिकलेर केले तसे मिळणार आहे. आता आमचे संभाजीनगरचे उमेदवार ऐन वेळी घोषीत झाले आणि निवडून आले. असे नसते राजकारणात. अनेक उमेदवार असे आहेत की शेवटपर्यंत डिकलेर होत नाही. डिकलेर केले आणि निवडून आलेत.'

लोकसभा निवडणुकीत सर्वेक्षणाच्या नावाखाली शिंदे गटाला दोन अंकी जागा देण्यासही भाजपचा विरोध असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा होती. मात्र भाजपपेक्षा निम्मे जागा लढवून शिंदे गटानं सरस कामगिरी केली. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपापूर्वीच शिंदे गटानं वर्धापन दिनाचं औचित्य साधून आतापासूनच भाजपवर दबावाचं राजकारण सुरू केल्याचं दिसतंय मात्र याला किती यश येणार हे जागावाटपानंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT