Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा
Manoj Jarange Patil VideoSaam Tv

Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा

Manoj Jarange Patil Targeted Vijay Wadettiwar Over Maratha Aarakshan: 'त्यांच्या समाजाचे त्यांना प्रेम आहे म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आमच्या समजासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही ही आमच्यासाठी शोकांतीका आहे. ', असे म्हणत जरांगे पाटील यांनी वड्डेटीवार यांच्यावर टीका केली.
Published on

ओबीसी समजाच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये यासाठी जालना येथे उपोषणाला बसलेल्या आमदार लक्ष्मण हाके यांची विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. यावेळी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) भावुक झाले होते. त्यावरूनच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वड्डेटीवार यांच्यावर टीका केली. 'आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते? आमच्या समाजासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही.', अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.

साम टीव्हीशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'त्यांच्या समाजाचे त्यांना प्रेम आहे म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आमच्या समजासाठी त्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही ही आमच्यासाठी शोकांतीका आहे. त्यांचे उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंबही आला नाही. हा सुद्धा विरोधीपक्ष नेता लक्षात राहण्यासारखा आहे. पिढ्यांपार मराठ्यांची लेकरं मेली आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही. खूप कौतुक करण्यासारखा आणि खूप विचार मांडणारा विरोधीपक्षनेता मिळाला राज्याला हे महत्वाचे आहे.', असे म्हणत जरांगे पाटील यांनी विजय वड्डेटीवार यांना टोला लगावला.

Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा
Vijay Wadettiwar News: 'चुकीच्या धोरणामुळेंच तणावाची परिस्थिती', मराठा- ओबीसी वादावरुन विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा!

चंद्रकांत पाटील यांनी 'रक्तसंबंध आणि सगे सोयऱ्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही जे मागत आहात ते पूर्वीच मिळाले आहे.', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'चंद्रकांत पाटील काय म्हणाले हे आता महत्वाचे आहे. ते जर म्हणत असतील की सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची गरज नाही. कारण यापूर्वीच त्याच्यासाठी कायदा झालेला आहे. त्यांचे असे म्हणणे दिसत आहे की सगे सोयरेची अंमलबजावणी करण्याची गरज नाही. ज्यांची नोंद मिळाली त्याच्या आजोबाला, त्याच्या चुलत्याला, त्याच्या मुलाला आणि त्याच्या आत्याला आरक्षण एक नोंदणी मिळाली तरी त्या आधारे मिळणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. पण आम्ही काय म्हणतोय हे सरकारने जरा समजून घ्यावे.', असे जरांगेंनी सांगितले.

Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा
Nagpur Hit And Run Case: नागूपर हिट अँड रन प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला, ४ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'मराठा समजात पिढ्यांन पिढ्या आणि परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतामध्ये लग्नाच्या सोयरिकी जुळतात ते सगेसोयरे ही व्याख्या आम्ही दिली होती १० महिन्यापूर्वी. वरील सर्व गणगोतातील सग्यासोयऱ्यांना त्याची नोंद सापडली. एक मराठा बांधवाची नोंद सापडली तर त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना द्यायचे. त्याची नोंद सापडली नसली तरी देखील त्याला म्हणतात सगेसोयरे. लग्नाचे गणगोतातील सोयरेधारी वेगळे आणि ज्याची नोंद सापडली ते नातेवाईक वेगळे. नातेवाईक म्हणजे पुतणे, चुलते, आजी-आजोबा हे. याला सोयरे नाही म्हणत. तुमच्या नेत्यात केव्हापासून याला सोयरे म्हणायला लागले आणि आम्हाला वेड्यात काढायला लागले.'

Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा
Nilesh Lanke News: पराभवानंतर सुजय विखेंना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका! खासदार निलेश लंकेंनी डिवचले; म्हणाले...

यावेळी जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. 'मी मुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांना सरळ सांगतो. सगेसोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याखेप्रमाणे व्याख्या झाली पाहिजे तरच अंमलबजावणी करा. चंद्रकात पाटील जसे म्हणतात त्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर ती आमची फसवणूक आहे पण असे करू नका. मराठ्यांना कुणबी आणि ओबीसीत आरक्षण कसे घ्यायचे हे आम्ही ठरवू. तुम्ही आमची फसवणूक करू नका. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही १३ तारखेला करणार आणि पुन्हा आमची फसवणूक करणार असाल तर असे करू नका.'

Manoj Jarange Patil Video: आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते?, जरांगे पाटील यांचा निशाणा
Chandrashekhar Bawankule Video : ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com