Laxman Hake Agitation: मुलाचं आमरण उपोषण, आईवडिलांचाही पाठिंबा! लक्ष्मण हाके यांच्या सांगोल्यातील मूळ गावीही आंदोलन

OBC Reservation News Today: लक्ष्मण हाके यांच्या आईवडिलांचाही ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग, सांगोला गावातही आंदोलन

पंढरपूर : ओबीसींच्या (OBC Reservation News Today) लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे सांगोला (Sangola News) तालुक्यात हाके यांच्या आई वडील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपवास सुरू केला आहे. तीन दिवसापासून त्यांच्या घरी चूल पेटली नाही. मायबाप सरकारने ओबीसींना न्याय द्यावा अशी मागणी हाके यांच्या कुटुंबाने केली आहे. सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावात लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे घर आहे. लक्ष्मण हाके यांचे वडील मेंढापाळ आहेत. वयोवृद्ध आई सतत आजारी असते. अशा अवस्थेत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. तर इकडे आपल्या मुलाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आई वडीलांनी घरीच उपवास सुरू केला आहे. तीन दिवसांपासून त्यांच्या घरी चूल पेटली नाही. सलग तीन दिवसांच्या उपवासामुळे लक्ष्मण हाके यांच्या आईची तब्येत खालावली आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचे वडील चिंताग्रस्त झाले आहेत. मराठा समाजा प्रमाणे सरकारने उपोषणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांच्या भगीनी छबु माने यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com