Maharashtra Politics : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मला मंत्रालायत कामे असतात, रोज रोज गावात येऊन मुके घ्यायचे काय? भाजप उमदेवाराचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Assembly Election: भाजप उमदेवाराचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बबन लोणीकर यांच्यानंतर भीमराव केराम यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : राज्यातील विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग पकडला आहे. सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघाकडून उमेदवारांकडून प्रचारसभा घेण्यात येत आहे. याचदरम्यान काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता नांदेडमधील भाजप उमेदवाराचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.

नांदेडमध्ये भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी वादग्रक्त वक्तव्य केलं आहे. किनवट मतदारसंघाचे भाजप उमेदवार केराम यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची किनवटच्या बोधडी येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी केलेल्या आमदार केराम यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.

भीमराव केराम काय म्हणाले?

'रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार भीमराव केराम यांनी केलं आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. भीमराव केराम गावात फिरत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत अशताना केराम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

बबनराव लोणीकर काय म्हणाले होते?

परतूरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मतदारसंघात कांद्यावर मोजण्या इतकी मते आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल बोलताना त्यांनी वक्तव्य केलं. लोणीकर यांच्या वक्तव्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलं तापलं. लोणीकर यांच्या वक्तव्याचा मराठा समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT