Bhagat Singh Koshyari  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: सरकार पडेल असं कृत्य राज्यपालांनी करायला नको होते; सरन्यायाधीशांचं महत्वाचं निरीक्षण

Maharashtra Politics: 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला," असा सवालही सरन्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

SC Hearing on Power Struggle in Maharashtra: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या सुनावणीत शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आजच्या सुणावणीमध्ये 'सरकार पडेल असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, लोकशाहीसाठी हे घातक आहे, असं परखड मत नोंदवत सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले आहेत. (Maharashtra Politics)

आजच्या सुणावणीत काय घडलं..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. आज राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. ज्यामध्ये त्यांनी ३८ शिवसेना आमदार, २ प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आणि ७ अपक्ष आमदारांनी जीवाला धोका असल्याचं राज्यपालांना सांगितले होते, असा युक्तीवाद केला. तुषार मेहता यांच्या वक्तव्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्वाचे निरिक्षण नोंदवत राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला.

काय म्हणाले सरन्यायाधीश..?

ज्यामध्ये त्यांनी "महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य. मात्र, अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागतो. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होते असे दिसून येत आहे. सरकार पडेल, अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती. विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र ही काही नवीन बाब नाही," असे म्हणत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक...

तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी "आमदारांच्या जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणे अयोग्य आहे असे म्हणत अधिवेशन पुढे असतानाही राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली. केवळ 34 आमदारांनी गटनेत्याची केलेली निवड योग्य आहे, हा एकच मुद्दा योग्य वाटतो. बाकी राज्यपालांनी राजकारणात उतरणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे," असेही निरीक्षण यावेळी नोंदवले.

एका रात्रीत संसार कसा मोडला?

"आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते. मात्र, अशा पद्धतीने विश्वासमत मागणे लोकशाहीसाठी घातक आहे. 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला," असा सवालही सरन्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT