
Maharashtra Assembly Session: सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच, राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी आज विधीमंडळातील अधिवेशनाला दांडी मारली. यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच, राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी आज विधीमंडळातील अधिवेशनाला दांडी मारली. यावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील शेतकरी प्रश्न, संपकरी कर्मचाऱ्यांचा मुद्दा, अशा लक्षवेधी मुद्द्यांवर विधिमंडळात चर्चा होणे अपेक्षित असताना शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांनी अधिवेशनाला अचानक दांडी मारली. त्यामुळे आज ८ पैकी केवळ एका लक्षवेधीवर चर्चा झाली. मंत्री उपस्थित नसल्याने ७ लक्षवेधीवरील चर्चा उद्यावर ढकलण्यात आली.
यावर अजित पवार चांगलेच संतापले. आज एकच लक्षवेधी झाली. सभागृहात मंत्री हजर नाही म्हणून इतक कामकाज थांबवले. देवेंद्रजी तुम्हाला sincere म्हणून बघतो. पण तुमचे लक्ष नाही. चंद्रकांत पाटील यांनी लवकर उठून आले पाहिजे. इतर मंत्र्यांनी सुद्धा सभागृहात वेळेवर हजर राहिलं पाहिजे. यांना विधिमंडळ कामकाजात रस नाही बाकींच्या कामात रस आहे. हा तर निर्लजपणाचा कळस झाला, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार भर सभागृहात संतापल्याने इतर मंत्र्यांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान, अजित पवार यांच्या या संतापावर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. चंद्रकांत पाटील काल रात्री १ वाजता घरी आले. त्यामुळे विलंब झाला. आम्ही मंत्र्यांना समज देऊ, अशी सारवासारव फडणवीसांनी केली.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अजित पवारांच्या या मुद्द्यावर प्रकाश टाकला. मंत्र्यांनी सभागृहात वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे. सरकारने सुद्धा याची खबरदारी घ्यावी,
2 हजार 376 लक्षवेधी ऑनलाईन आल्या आहेत. आपण गेल्या सहा दिवसात 57 लक्षवेधी चर्चा केली आहे. नियमानुसार तीन लक्षवेधी घेतल्या जातात पण आपण जास्त लक्षवेधी घेतो. यापुढे जास्तीत जास्त लक्षवेधी घेऊ, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना दिलं.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.